दत्त जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांनी राबवले स्वच्छता अभियान!

अकोले प्रतिनिधी
अखंड हरिनाम सप्ताह व दत्त जयंतीचे औचित्य साधून राजा हरिश्चंद्र माध्यमिक विद्यालय ठोकळवाडी शेणीत येथील विद्यार्थ्यांनी मंदिर आणि मंदिराच्या परिसरात स्वच्छता अभियान राबवले.
यामध्ये रस्त्याची स्वच्छता, कागद व इतर कचऱ्याची होळी करण्यात आली. यावेळी शेणीत येथील सप्ताह कमिटी व गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सप्ताहातील प्रवचन ऐकण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला. प्रवचनकार म्हणाले,”अध्यात्म ही जगाची सर्वात मोठी शक्ती आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज, सद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, आदी संतांनी संपूर्ण मानव जातीला भक्ती व व्यवहार यांची सुरेख सांगड घालून या संसाररूपी व सागरातून तरुण जाण्याचा मार्ग सोपा करून दिला”.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री दातीर सर, श्री जाधव सर, श्री नवले सर, श्री बेणके सर, श्री बडे सर, शिक्षकेतर कर्मचारी, गावकरी मंडळी मधुकर धोंगडे, पुनाजी धोंगडे सर, भाऊराव धोंगडे, विठ्ठल बाबा धोंगडे, लक्ष्मण बिडवे, आरोटे बाबा, भानुदास जमदाडे, जगन बिडवे, जालिंदर बिडवे, हनुमंता धोंगडे, नामदेव धोंगडे, प्रवचनकार गोविंद शिरसागर, सरपंच गोविंद करवंदे, गुरुदत्त भजनी भारुड मंडळ उपस्थित होते.