इतर

हृदय विकारापासूम दूर रहाण्यासाठी आपल्या जीवन शैलीत बदल करणे गरजेचे- हृदय रोग तज्ञ डॉ.धर्माधिकारी


अकोले प्रतिनिधी-
जीवन शैलीत योग्य बदल केल्यास हृदय विकाराचा धोका रहात नाही. त्या साठी नियमित व्यायाम,चांगली झोप,योग्य आहार,व्यसनांपासून दूर रहाणे, योग, प्राणायाम,नियमित आरोग्य तपासणी व तणावमुक्त जीवन याचा अंगीकार करण्याची गरज आहे.प्रत्येकाने या प्रकारे जीवन शैलीत बदल करून आपले आयुष्यमान वाढवावे असे प्रतिपादन हृदयरोग तज्ञ डॉ अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी केले.

डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी यांचे श्री साईबाबा हार्ट & इन्स्टिट्यूटअँड रिसर्च सेंटर,नाशिक,आणि अकोले मेडिकल फाऊंडेशन- अकोले हॉस्पिटल व रोटरी क्लब अकोले सेंट्रल च्या वतीने अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत हृदरोग व मधुमेह निदान शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला .
या प्रसंगी हृदय रोगावर नाशिक येथील हृदयरोग तज्ञ डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते . या व्याख्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लब अकोले सेंट्रलचे अध्यक्ष विद्याचंद्र सातपुते होते.


या कार्यक्रमास आमदार डॉ किरण लहामटे , ह. भ. प. दीपक महाराज देशमुख, प्रकाश टाकळकर ,प्रशांत वाकचौरे(सहायक अभियंता श्रेणी १, कर्जत),डॉ.रुपाली वाकचौरे, डॉ.प्रकाश वाकचौरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.बाळासाहेब मेहेत्रे, आत्मा चे अध्यक्ष डॉ.सखाराम धनकुटे डॉ.मारुती भांडकोळी सर डॉ.तुषार गावडे डॉ.अद्वैत देशपांडे, डॉ.प्रतीक घोडके, डॉ.सचिन हाडवळे, डॉ.प्रल्हाद देशमुख , डॉ .पांडुरंग भारमल,डॉ.जीत कुलकर्णी , डॉ. मच्छिंद्र मंडलिक,डॉ.शिवाजी वैद्य नगरसेविका शीतल वैद्य,श्रीकृष्ण चंदनकर,दत्तात्रय गव्हाणे,जेष्ठ विधिज्ञ आर.डी.नवले,मुख्याध्यापक श्री.गायकवाड,एन .टी. कदम, बाळासाहेब वाकचौरे ,रोटरीचे सेक्रेटरी अमोल देशमुख ,खजिनदार संदीप मोरे,संस्थापक अध्यक्ष अमोल वैद्य,माजी अध्यक्ष सचिन आवारी ,सचिन शेटे, सदस्य विजय पावसे,प्राचार्य डॉ.संजय ताकटे, निलेश देशमुख ,रोहिदास धुमाळ ,संदीप शिंदे ,डॉ गणेश नवले,आदींसह नर्सिंग स्टाफ व हॉस्पिटलचा स्टाफ सह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या शिबिरात डॉ अनिरुध्द धर्माधिकारी यांनी हृदयरोग व मधुमेह याबाबत मार्गदर्शन केले.यावेळी त्यांनी आत्ताची बदलती जीवन शैली व त्याचे जीवनावर होणारे परिणाम ह्याचे अत्यंत चांगल्या पद्धतीने व उदाहरणे देऊन उपस्थित नागरिकांना समजावून सांगितले.
बाल वयात होणाऱ्या हृदयरोगाबद्दलही सविस्तर माहिती आलेल्या नागरिकांना दिली . हृदयविकाराचे कारणे सांगताना त्यांनी मानसिक ताण,अपूर्ण झोप, ब्लड प्रेशर,गोड, तेलकट व मसालेदार पदार्थ खाणे,विशिष्ट जिवाणूंचा संसर्ग, अनुवंशिकता, डायबिटीस, व्यसन,मांसाहारी आहार,नियमित औषधे न घेणे,कोलोस्ट्रोल जास्त होणे,वाढलेले वजन,व्यायाम करण्याचा आळस, अशी विविध करणे असून आपण नियमित व्यायाम,योगासने करावीत.आणि आपल्या जीवनशैली मध्ये योग्य बदल करावा.असे मत व्यक्त केले. तसेच विज्ञानाने अलोपॅथी च्या औषधात मोठे आमूलाग्र बदल केले असून त्यामुळे मानवाचे 20 वर्षाने वाढले आहे.

या शिबिरात 221 हुन जास्त नागरिकांनी आपली तपासणी करून घेतली तपासणी अंती रक्तातील साखर, ईसीजी , बीपी, मधुमेही रुग्णाची मागील तीन महिन्याची साखर(HBA1C )तपासणी देखील करण्यात आली. हृदयरोग तज्ञ डॉ अनिरुध्द धर्माधिकारी, व एम.डी. मेडीसीन डॉ कुणाल निकम ,अतिदक्षता तज्ञ् डॉ जयेश रेलन यांनी रुग्णांना योग्य मार्गदर्शन केले. तपासणी अंती ज्या रुग्णांना अँजीओग्राफी , अँजिओप्लास्टी , बायपास करावयास सांगितले आहे अशा रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत सर्व सुविधा श्री साईबाबा हार्ट इन्स्टिटयूट नाशिक मध्ये सातत्याने होतात अशी माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी संतोष आहेर यांनी दिली.
सदर शिबिरात रोटरी क्लब अकोले, अकोले हॉस्पिटल अकोले ,अकोले मेडिकल फाऊंडेशन अकोले यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. हेमंत मंडलिक सर यांनी केले तर आभार डॉ. प्रकाश वाकचौरे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button