सीड इंडिया फाउंडेशनच्या उपक्रमात श्री बाळेश्वर आश्रम शाळाचे यश.

संगमनेर प्रतिनिधी
सीड इंडिया फाउंडेशनच्या उपक्रमात श्री बाळेश्वर आश्रम शाळाने . यश मिळवले आहे SHIF फाउंडेशन या सचिन तेंडुलकर व स्पायडर इलेक्ट्रिक कंपनीच्या वतीने भारतामध्ये ग्रीन एनर्जी जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केलं जाते यासाठी भारतामधील चार जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली होती.
त्यातील महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याची निवड करण्यात आली. सीड इंडिया फाउंडेशन अहमदनगर या संस्थेमार्फत अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पंधरा शाळेची निवड करण्यात आली.. या मार्फत शाळांना 55 इंच सॅमसंग स्मार्ट टीव्ही, व 1 kv सोलर युनिट देण्यात आले तसेच 100 विद्यार्थ्यांची निवड करून त्यांच्याकडून ग्रीन एनर्जी संदर्भात विविध उपक्रम, वृक्षारोपण,चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, भाषण स्पर्धा,निबंध स्पर्धा, व विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले.
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित श्री बाळेश्वर प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेची निवड या उपक्रमासाठी करण्यात आलेली होती. यासाठी शाळेतील शिक्षक श्री राजेश सांगळे व श्री राजाराम बांबळे .श्री अण्णासाहेब भागवत त्यांच्यामार्फत शाळेत विविध उपक्रम राबविण्यात आले.
आज या संस्थेमार्फत पारितोषिक वितरण समारंभ अहमदनगर येथील यश पॅलेस या हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. विज्ञान प्रदर्शनात शालेय प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थी कु. अनुष्का दशवंत, कु.स्नेहल बांबळे कु कमल गभाले यांना प्रशस्तीपत्रकव सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच कु.सानिका घाणे हिस चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्यामुळे प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.या सर्व उपक्रमांमधून सर्वोत्कृष्ट शिक्षक अवॉर्ड श्री सांगळे राजेश यांना देण्यात आले.
सीड फाउंडेशन अहमदनगर यांचे मार्फत हा उपक्रम राबविण्यात आला. प्रकल्प प्रमुख मा श्री. रवी शर्मा सर, व मा श्री मनोज उदमले सर. यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते,पारितोषिक वितरणासाठी मा. शिक्षणाधिकारी श्री कडूस साहेब, श्री पुजारी साहेब, व डॉ फिरोदिया उपस्तित होते.
या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. रा ह दरे साहेब, सेक्रेटरी ऍड विश्वासराव आठरे साहेब. जेष्ठ विश्वस्त श्री जी डी खानदेशे साहेब डॉ सी के मोरे साहेब प्राचार्य चंद्रकांत शिरोळे सर प्रा. मुख्यध्यापक श्री सोपान पवार सर यांनी विशेष अभिनंदन केले.