इतर

२१ ते २४ डिसेंबरला राजूर ला भव्य डांगी जनावरांचे प्रदर्शन!

अकोले प्रतिनिधी


,
अकोले तालुक्या तील राजूर येथे दर वर्षी प्रमाणे डिसेंबरच्या शेवटचे आठवड्यात देशी
विदेशी जनावरांचे व कृषी मालाचे प्रदर्शन यावेळी २१ ते २४ डिसेंबर रोजी भरणार आहे .

स्वर्गीय माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे दुःखद निधन झाल्यामुळे एक आठवडा हे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्या ची माहिती सरपंच सौ पुष्पाताई निगळे उपसरपंच संतोष बनसोडे आणि ग्रामविकास अधिकारी राजेंद्र वर्पे यांनी दिली.

राजूर येथे दरवर्षी डिसेंबर महिन्यात राजूर ग्रामपंचायत, पंचायत समिती, आदिवासी विकास विभाग आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डांगी आणि देशी- विदेशी जनावरांचे व कृषी मालाचे प्रदर्शन भरत असते. या प्रदर्शनासाठी अकोले तालुक्याबरोबर इगतपुरी, संगमनेर, जुन्नर, सिन्नर आदी तालुक्यांतून हजारो जनावरे खरेदी विक्री तर काही जनावरे प्रदर्शनासाठी शेतकरी आणत असतात. नगर, नाशिक, मालेगाव, सटाणा, औरंगाबाद आदी ठिकाणाहून जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी व्यापारी येथे दाखल होत असतात. सलग चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात हजारो नागरिक आपली हजेरी लावत असतात.
विविध व्यावसायिक आपली दुकाने यात मांडत असतात. या सर्व माध्यमातून या प्रदर्शनात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते.-या प्रदर्शनात अनेक भागातून लाखो लोकांची उपस्थित रहाते यात करमणुकीचे खेळ,रहाट पाळणे,लहान मुलांचे आकर्षण असते अनेक व्यावसायिकांचे दुकाने खेळणी ,खाद्य पदार्थ विक्री चे दुकाने थाटली जातात

तर दारू अन जुगार अड्डे

उध्वस्त करू- विजय पवार


प्रदर्शनातील या गर्दीचा फायदा घेत राजुर मध्ये दारूबंदी असतानाही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध देशी विदेशी दारू विक्री तुन मोठी उलाढाल होते तसेच चक्री जुगारासारखे खेळातून नागरिकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होते याकडे राजुर पोलीस स्टेशन आणि राजुर ग्रामपंचायतीने लक्ष द्यावे अन्यथा रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते दारू आणि जुगाराचे अड्डे उध्वस्त करतील असा इशारा आर पी आय चे अकोले युवक तालुकाध्यक्ष विजय पवार यांनी दिला आहेप्रदर्शनात रहाट पाळणे या खेळामध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेतली जात नाही यासाठी रहाट पाळणे या खेळांना उंचीची मर्यादा घालून द्यावी अशी मागणी श्री विजय पवार यांनी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button