परभणी घटनेच्या निषेधार्थ अकोल्यात होणाऱ्या जनाअक्रोश आंदोलनात मोठया संख्येने सहभागी व्हा – विजय पवार

अकोले प्रतिनिधी
परभणीत येथे संविधान शिल्पाची विटबंना व आंबेडकरी समाजावर झालेल्या पोलिस अत्याचाराच्या निषेधार्थ अकोले येथे सोमवार दि. २३/१२/२०२४ रोजी स.१०.०० वा होणाऱ्या जन आक्रोश आंदोलनास तालुक्यातील जनतेने मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आर पी आय तालुका युवक अध्यक्ष विजय पवार यांनी केले आहे
आर पी आय चे राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांचे नेतृत्वाखाली या दिवशी – महात्मा फुले चौक ते तहसील कार्यालय अकोले असा जन आक्रोश मोर्चा काढला जाणार आहे
परभणी येथे एका माथेफिरूने संविधान शिल्पाची तोडफोड केली. हा संविधानाचा आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आवमान आहे. म्हणूनच परभणी व महाराष्ट्रात संतापलेल्या संविधान प्रेमींचे मोठ-मोठे मोर्चे, बंद, निदर्शने आदी आंदोलने झाली. हे आंदोलने जाणिवपूर्वक दडपण्याचा प्रयत्न झालेला आहे. पोलीस प्रशासनाने माथेफिरु व संबंधीत पोलीसांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.चौकशीच्या निमित्ताने कोबिंग ऑपरेशन करून आंबेडकरी चळवळीतील महिलांना, विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण झाली. याच मारहाणीमध्ये सोमनाथ सुर्यवंशी यांचा देखील मृत्यू झाला. हा मृत्यू नसून पोलिसांनी केलेला खून आहे. म्हणूनच जातीय प्रवृत्तीच्या व मस्तावलेल्या पोलीस प्रशासनाला जाग आणण्यासाठी पीडीत कुटुंबाला न्याय देण्यासाठी कार्यरत असलेले एस.पी. परभणी, पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी यांना निलंबीत करून गुन्हे दाखल करण्यासाठी अकोले तालुका आंबेडकरी जनतेच्या वतीने भव्य जन आक्रोश आंदोलन आयोजित केले आहे. तरी गावागावातून, वाड्यावस्त्यातून सोमवार दिनांक २३ डिसेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता
तमाम आंबेडकरी चळवळीत काम करणाऱ्या समाज बांधव व संविधान प्रेमीं नी हजारोंच्या संख्येने या आंदोलनास उपस्थित रहावे, असे आवाहन आर पी आय युवक तालुका अध्यक्ष विजय पवार यांनी केले आहे
——-//——-