आखिल भारतीय ओ. बी. सी. सेवा संघ नाशिक शहर महिला सरचिटणीस पदी सुनीता धनतोले यांची निवड

डॉ शाम जाधव
नाशिक-आखिल भारतीय ओ. बी. सी. सेवा संघ महाराष्ट्र राज्य नाशिक शहर महिला सरचिटणीस पदी सुनीता धनतोले यांची नियुक्ती करण्यात आली
दि. २ फेब्रुवारी २०२५रविवार रोजी नाशिक येथे अखिल भारतीय ओ. बी. सी सेवा संघाचे संस्थापक आध्यक्ष मा. श्री हनुमंत सुतार सर यांच्या मार्गदर्शनाणे ओ बी सी संघांचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष प्रा. श्री नानासाहेब टेंगले यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आढावा बैठक संपन्न झाली.व नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी आखिल भारतीय ओ बी सी सेवा संघ च्या नाशिक शहर महिला सरचिटणीस पदी सौ सुनीता धनतोले यांची निवड करण्यात आली. व त्यांना पुढील कार्या साठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी नाशिक शहरचे कल्पना सोनार, राणी कासार, ज्योती कुपते, दीपाली दाहीजे, जयश्री मॅडम, रमेश दंडगाव्हाल, डॉ संदीप काकड व इतर पदाधिकारी उपस्थित होते.