अकोल्यात ३८वा जागतिक ग्राहक दिन साजरा

अकोले प्रतिनिधी
अकोले तहसिल कार्यालयात ३८वा जागतिक ग्राहक दिन अकोल्याचे तहसिलदार श्री. सिध्दार्थ मोरे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा झाला. यावेळी स्वामी विवेकानंद प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते झाले.
यावेळी तहसीलदार सिध्दार्थ मोरे, ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलिक, तालुका अध्यक्ष दत्तात्रय शेनकर, अगस्ति कारखान्याचे संचालक प्रदिप हासे, महेश नवले, प्रा. बाळासाहेब बनकर, संजय गांधी, नायब तहसिलदार मार्तंड माळवे, सार्वजनिक बांधकामचे एम. डी. चव्हाण, राम रुद्रे, शारदा शिंगाडे, पुरवठा निरीक्षक संदिप निळे, आदिंसह बऱ्याच विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रतिनीधी म्हणून उपस्थित होते.
यावेळी ग्राहकांनी दिलेल्या अर्जाचे वाचन करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून त्याचा पाठपुरावा करून अर्जांना न्याय दिला जाईल असे तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांनी स्पष्ट केले.प्रत्येक ग्राहकदिनाला सर्वच अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याची नोटिसा देण्यात येणार असल्याचे सांगितले.
यावेळी लहीतचे सरपंच विवेक चौधरी यांनी ह्या मीटिंगला बी. डी. ओ हजर नसल्याचे सांगून लहीत ग्रामपंचायतीला पूर्णवेळ ग्रामसेवक द्यावा अशी मागणी केली. रुंभोडी, इंदोरी, अकोले गावचे व शहराचे पाणी , ड्रेनेजचे पाणी प्रवरा नदी पात्रात सोडत असल्याने पाणी दुषित होत असल्याने त्यावर गांभीर्याने विचार करावा असे भाऊसाहेब वाकचौरे यांनी निदर्शनास आणून दिले.
अकोले नगरपंचायत कचरा डेपोचे निर्मूलन करावे. त्यापासून कोणतेही प्रदुषण होऊ नये, कोल्हार घोटी मुख्य रस्त्याच्या साईट गटारीवर ढापे टाकावेत, कृषी उत्पन्न बाजार समितीने सोयाबिन व मका खरेदी केंद्र शासनाच्या निर्णयानुसार हमी भाव खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे.

अकोले शहरात व तालुक्यात बिबट्यांचा संचार मोठ्या प्रमाणात आहे.वनखात्याने बिबटे पकडण्यासाठी पिंजरे लावावेत, आढळा विभागात मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड चालू आहे. राजूर व अकोले वनक्षेत्रात वनाधिकऱ्यांच्या आशीर्वादाने मोठ्या बेकायदा वृक्षतोड होत आहे ह्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी.तालुक्यातील पश्चिम भागातील भंडारदरा धरणाच्या भागातील रिंग रोड रस्त्याचे अत्यंत निकृष्ट काम झाल्याचे सामाजिक कार्यकर्ते आनंद घाणे यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. शेकईवाडीचे प्रा. लक्ष्मण गायकवाड यांच्या शेतातील विजेचे पाच पोल सरकवण्याचे आश्वासन स्वतः प्रितमसिंग परीहार (अभियंता) यांनी दिले. कृषिविभागाच्या अनेक अडचणींचा पाढा शेतकऱ्यांनी वाचला. शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारींचे अर्ज आले होते मात्र शेतकरी दिन व ग्राहक दिन असताना गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे कृषि अधिकारीच गैरहजर होते यामुळे ती नाराजी व्यक्त केली.
अकोले, रूंभोडी, सावंतवाडी, निळवंडे ह्या बसेसच्या फेऱ्या त्वरित वाढवाव्यात, अकोले तालुक्यातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी बसेसच्या संख्या एस टी डेपोने वाढवावी. अकोले तालुक्यात गॅस एजन्सीने गॅस पोहोच करताना वाढीव पैसे घेऊ नयेत, रेशन कार्ड धारकांची संख्या वाढवावीत . पुरवठा विभागाने सर्व रेशनकार्ड धारकांना लवकरात लवकर रेशनकार्ड द्यावे, अकोले ते माळीझाप रस्त्यावरील पानओढ्यातील पुलाचे काम व उंची वाढवावी. इंदोरी फाटा येथे गतिरोधक टाकावेत. प्रत्येक शासकीय कार्यालयात महापुरुषांची फोटो लावावीत अशा अनेक मागण्या ग्राहकांनी या ग्राहक दिनात केल्या.
यावेळी सीताराम खतोडे, शिवाजी आरज, राम रुद्रे, संजय नवले, मच्छिंद्र मंडलिक,रामदास पांडे, भाऊसाहेब वाकचौरे, राजेंद्र लोखंडे, नंदकुमार देशमुख, सुदाम मंडलिक, शारदा शिंगाडे, पांडुरंग पथवे, अस्वले हरिभाऊ, सुनिल देशमुख, सुनिल नवले, अनिल कोळपकर, कैलास तळेकर, किरण चौधरी, कारभारी बंदावणे आदि उपस्थित होते.