आजचे पंचांग व राशिभविष्य दि २३/०३/२०२५

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र ०३ शके १९४७
दिनांक :- २४/०३/२०२५,
वार :- इंदुवासरे(सोमवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:३१,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:४०,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- फाल्गुण
पक्ष :- कृष्षपक्ष
तिथी :- दशमी समाप्ति २९:०६,
नक्षत्र :- उत्तराषाढा समाप्ति २८:२७,
योग :- परिघ समाप्ति १६:४४,
करण :- वणिज समाप्ति १७:२८,
चंद्र राशि :- धनु,(१०:२५नं. मकर),
रविराशि – नक्षत्र :- मीन – उ. भा.,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- मीन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नहीत,
शुभाशुभ दिवस:- १७प. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ०८:०२ ते ०९:३३ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
अमृत मुहूर्त — सकाळी ०६:३१ ते ०८:०२ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ०९:३३ ते ११:०४ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०३:३८ ते ०५:०९ पर्यंत,
अमृत मुहूर्त — संध्या. ०५:०९ ते ०६:४० पर्यंत,
❀ दिन विशेष:
अमृत २८:२७ नं., घबाड २८:२७ प., दग्ध २९:०६ नं., भद्रा १७:२८ नं. २९:०६ प., मृत्यु २८:२७ प.,
————–
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- चैत्र ०३ शके १९४७
दिनांक = २४/०२/२०२५
वार = इंदुवासरे(सोमवार)
मेष
घरातच मन रमेल. घर टापटीप ठेवाल. जुनी पुस्तके काढून वाचत बसाल. चटपटीत पदार्थ खाल. दिवस मजेत घालवाल.
वृषभ
मित्रांशी गप्पा माराल. जवळचा प्रवास कराल. नवीन गोष्टींची माहिती जमवाल. भावंडांशी सलोखा वाढेल. प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल.
मिथुन
पत्नीचा सहवास हवाहवासा वाटेल. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. फार थंड पदार्थ खाऊ नयेत. काही कामे उगाचच अडकून पडतील. स्वप्नात रमून जाल.
कर्क
उगाचच घाई-घाई करू नका. आपल्या मर्जीने वागाल. बाहेरील गोष्टींचा फार विचार करू नका. चंचलतेवर मात करावी. मनातील आकांक्षा पूर्ण होईल.
सिंह
विचारात वाहून जाऊ नका. मानसिक स्थैर्य जपावे. हातातील कला सर्वांसमोर सादर करता येईल. तुमच्या विचारांचा प्रभाव पडेल. भागीदारीत नफा मिळेल.
कन्या
इतरांचा विश्वास संपादन करावा. हातातील कामात यश येईल. घरगुती प्रश्न सोडवावेत. नातेवाईकांची मदत मिळेल. आत्मविश्वास सोडून चालणार नाही.
तूळ
गैरसमजाला मनात जागा देऊ नका. मुलांशी खेळण्यात वेळ घालवाल. नातेवाईकांची नाराजी दूर करावी. गृहशांती जपावी लागेल. मुलांची मते जाणून घ्यावीत.
वृश्चिक
धाडस करतांना सतर्क राहावे. शाब्दिक चकमक टाळावी. हातापायांना किरकोळ इजा संभवते. कामातून समाधान शोधावे. जोडीदाराचे सौख्य वाढीस लागेल.
धनू
फसवणुकीपासून सावध राहावे. बाहेर फिरताना मौल्यवान गोष्टी सांभाळाव्यात. अनाठायी खर्च होऊ शकतो. अपयशाने खचून जाऊ नका. धार्मिक गोष्टीत मन रमवा.
मकर
अडथळ्यातून मार्ग काढावा. प्रकृतीची काळजी घ्यावी. आततायीपणे निर्णय घेऊ नका. इतरांच्या मनाचा विचार करावा. नातेवाईकांशी सलोखा ठेवावा लागेल.
कुंभ
अधिकारी व्यक्तींचा सल्ला घ्यावा. चित्त एकाग्रतेसाठी ध्यानधारणा करावी. गरज नसतांना खर्च करू नका. आपली संगत तपासून पहावी. जबाबदारीची जाणीव ठेवावी.
मीन
काही कामे वेळ घालवतील. उगाचच खिळून पडल्यासारखे वाटू शकते. मनातील भीती बाजूला सारावी. स्वत: साठी वेळ बाजूला काढावा. उष्णतेचा त्रास जाणवेल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर