संत पॉल चर्च हंग्याचे धर्मगुरू पास्टर सुनील सूर्यवंशी यांचे निधन

पारनेर – पारनेर तालुक्यातील हंगा येथील रहिवासी पास्टर सुनील सूर्यवंशी यांचे वयाच्या ५२ व्या वर्षी रविवार दि.२२ रोजी रात्री १ वाजता हृदयाच्या तीव्र झटक्याने निधन झाले .
पास्टर सुनील सूर्यवंशी हे पारनेर तालुका पास्टर असोसिएशनचे अध्यक्ष होते.अध्यक्ष पदावर असताना अन्याय होण्याऱ्या व्यक्तींना न्याय देण्याचे काम केले. पास्टर सुनील सूर्यवंशी यांचे चर्च हंगा इथे भरत असत. अतिशय विनम्र भावाने त्यांनी येशू ख्रिस्ताची सेवा केली.अनेक लोकांना त्यांनी येशू ख्रिस्तांच्या शांतीचा मार्ग दाखवला. सेवा करत असताना पारनेर तालुक्यासह त्यांनी संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात आपल्या सेवेतून अनेक लोक जोडली. त्यांच्या जाण्याने संपूर्ण हंगा चर्च मंडळी,घरातील परिवार, नातेवाईक मित्र यांना दुःख झाले आहे.त्यांच्या पश्चात त्यांचे भाऊ गंगाराम सूर्यवंशी, अनिल सूर्यवंशी, विलास सूर्यवंशी, अशोक सूर्यवंशी, बहीण मीना सूर्यवंशी,बहीण जयश्री वाझ,मेहुणे पास्टर जेसन वाझ,भाचे जोएल वाझ,भाची जेसीका वाझ या परिवारातील सदस्यांना अतिशय दुःख झाले आहे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ परिवार यांनी भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली.