पुण्यात भारतीय मजदूर संघ च्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

पुणे-अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशदाब्दी जन्म दिनाच्या् निमीत्ताने भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा च्या वतीने सारसबाग समोरील पुतळ्याला पुष्प हार अर्पण करून त्यांनी समाजासाठी केलेला कार्याचा आदर्श ठेवून वाटचाल करण्याचा निर्धार करावा असे आवहान भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष श्री अर्जुन चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना केले आहे.
अहिल्या देवी होळकर यांनी भारतात विविध तीर्थक्षेत्री मंदिरे बांधली, जिर्णोव्दार केले , या मधून निश्चीतच रोजगार निर्मिती झाली, कुशल विणकर कामगारांना एकत्रित करून महेश्वर साडी ची निर्मिती केली. राज्यकारभार करताना महिलांचे सैन्य दल उभारले होते. भूमीहीन शेतकरी करिता योजना, अन्नदत्रे उभारून शोषित पिडीत गरजवंताना मदत केली. विधवा महिलांचे धन संपत्ती जप्त कायदा रद्द करून विविध योजना महिलांच्या करिता निर्माण करून कल्याणकारी राज्य म्हणून आर्दश समाजा समोर ठेवला आहे.

शैक्षणिक धोरण, आरोग्य या मध्ये ही महत्वपूर्ण योगदान दिले आहे.
या त्रिशदाब्दीच्या निमित्ताने भारतीय मजदूर संघ राष्ट्रीय स्तरावर व पुणे जिल्हा मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संघटीत असंघीटत क्षेत्रातील महिला कामगारांना एकत्रित करून कल्याणकारी योजना, महिलां कामगारांच्या करिता धोरण, या बाबतीत विविध विषयांवर चर्चा सत्रांचे आयोजन , महिला संमेलन आयोजित करणार आहे. या मध्ये महिला कामगारांनी सहभागी होवून योगदान द्यावे असे आवाहन केले आहे.
या वेळी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष श्री अर्जुन चव्हाण, महिला विभाग पदाधिकारी अॅड संध्या खरे, सुजाता वाळुंज, सुनंदा मानकर, शारदा थोरात, सुनिता साठ्ये, अभय वर्तक, ऊमेश विस्वाद, गणेश टिंगरे, विवेक ठकार, संतोष कुंभार, उल्हास देवपुरकर आदी पदाधिकारी व विविध ऊद्योगातील पदाधिकारी उपस्थित होते.