माजी प्रधानमंत्री व जागतिक किर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ मनमोहन सिंग यांचे निधन

देशाचे माजी प्रधानमंत्री आणि आर्थिक सुधारणांचे जनक व जागतिक किर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. त्यांनी अतिशय कठिण काळात भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक पातळीवर सन्मान प्राप्त करुन दिला.देशाचे नेतृत्व करताना त्यांनी आपली अद्वितीय बुद्धिमत्ता आणि नम्रतेचे दर्शन घडविले. भारताच्या विकासात त्यांचे योगदान अतुलनीय असेच आहे.त्यांच्या निधनामुळे एका पर्वाचा अस्त झाला आहे.महादर्पण न्यूज परिवाराकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
२६ डिसेंबर २०२४ भारताचे दिग्गज माजी पंतप्रधान, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांनी
दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला डॉ. मनमोहन सिंह यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले . त्यांची २६ डिसेंबर रोजी अचानक प्रकृती बिघडल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. सरसत्या वर्षाच्या अखेरच्या आठवड्यात कोट्यवधी देशवासीयांच्या मनाला चटका देणारी बातमी समोर आली आहे.
त्यांना श्वसनास त्रास होत होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी एम्स रुग्णालयात दिग्गज डॉक्टरांच्या टीमने त्यांच्यावर उपचार केले. मनमोहन सिंह यांच्या फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर आली. डॉक्टरांनी लगेच मनमोहन सिंह यांच्यावर उपचार सुरु केले. त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आलं. पण त्यांची प्रकृती चिंताजनक होती काही वेळाने त्यांच्या निधनाची बातमी समोर आली
मनमोहन सिंह यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी पंजाबच्या गाह (सध्याच्या पाकिस्तानातील पंजाब) येथे झाला होता. ते देशाचे १४ वे पंतप्रधान होते. मनमोहन सिंह हे अर्थशास्त्रात उच्चशिक्षित आहेत. त्यांनी पंजाब
विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड
विद्यापीठ सारख्या नामांकीत विद्यापीठांमधून शिक्षण
घेतलं आहे. त्यांनी १९५७ ते १९६५ या काळात पंजाब
विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केलं आहे. तर ते
१९६९/७१ या काळात दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेत आंतरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक होते. त्यानंतर १९७६ मध्ये ते दिल्लीमधील
जवाहरलाल नेहरू विद्यापिठात मानद प्राध्यापक
म्हणून रुजू झाले. विशेष म्हणजे १९८२ ते १९८५ या
काळात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. तर
१९८५/८७ या काळात भारताच्या योजना आयोगाचे
उपाध्यक्ष होते. तसेच १९९० ते १९९१ या कार्यकालात
पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार होते. यानंतर १९९१
मध्ये केंद्र सरकारमध्ये अर्थमंत्री होते.