इतर

काही शक्ती धर्माच्या नावाने दंगली घडवत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा गंभीर आरोप

अहमदनगर’- अहमदनगरमध्ये काही शक्ती धर्माच्या नावाने अंतर वाढवून दंगली घडवत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

अहमदनगरमध्ये काही शक्ती धर्माच्या नावाने अंतर वाढवून दंगली घडवत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. यावेळी त्यांनी कर्नाटकचं उदाहरण देत तेथेही त्या लोकांनी सत्तेचा वापर करून द्वेष पसरवल्याचा आरोप करत जनतेने त्यांना धडा शिकवल्याचं नमूद केलं आणि भाजपावर हल्लाबोल केला. तसेच कर्नाटकात होऊ शकतं, तर देशातील कोणत्याही राज्यात होईल यासाठी प्रयत्न करणं आपली जबाबदारी असल्याचं मत व्यक्त केलं. ते रविवारी (२१ मे) अहमदनगरमध्ये बोलत होते.

शरद पवार म्हणाले, “धर्माच्या नावाने अंतर वाढवलं जात आहे. हा नगर जिल्हा पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो. अनेक ऐतिहासिक काम करणारे मान्यवर या जिल्ह्यात होऊन गेले. याच नगर जिल्ह्यात शेवगावला दोन ते तीन दिवस बाजारपेठ बंद होती.”

“…तर कष्ट करणाऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त होईल”

“काही शक्ती जाती-जातीत अंतर वाढवून संघर्ष वाढवत आहे. त्या शक्तीशी लढाई करणं, संघर्ष करण्याचं आव्हान माझ्यासह तुमच्यासह सर्वांवर आहे. हे केलं नाही, तर कष्ट करणाऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आपण तयारी केली पाहिजे,” असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं.

कर्नाटकातही माणसांमध्ये द्वेष पसरवण्याचं काम”

शरद पवार पुढे म्हणाले, “देशातील चित्र बदलत आहे. काल मी बंगळुरूमध्ये होतो. तिथं नवं सरकार आलं आहे. तिथं अनेक वर्ष काही लोकांचं राज्य होतं. त्या लोकांनी त्यांच्या सरकारच्या काळात माणसांमध्ये द्वेष पसरवण्याचं काम केलं. सर्व देशाला वाटत होतं की, कर्नाटकची निवडणूक सत्ताधारी भाजपा जिंकणार. मात्र काल शपथविधी झाला आणि सामान्य माणसाचं सरकार सत्तेत आलं. यावेळी एक लाखापेक्षा अधिक लोक शपथविधीला हजर होते. त्यापैकी ७० टक्के तरुण होते आणि सर्व जातीजमातीमधील होते.”

कर्नाटकात एक धनगर समाजाचा माणूस मुख्यमंत्री झाला”

“कर्नाटकात एक धनगर समाजाचा माणूस मुख्यमंत्री झाला. तो कष्टकरी आहे आणि तेथील लोकांच्या हिताची जपवणूक करतो. अशा लहान जातीवर्गातील व्यक्तीने कर्नाटकात मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. हे घडलं कारण कष्टकरी लोकांची एकजुट होती. ती एकजुट कर्नाटकात होऊ शकते, तर देशाच्या इतर राज्यातही झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करण्याचा हा काळ आहे,” असंही पवारांनी नमूद केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button