अहमदनगर येथे महाज्योती चे कार्यालय सुरू करा माळी महासंघाची मंत्र्यांकडे मागणी

अहमदनगर प्रतिनिधी
माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आविनाश ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार माळी महासंघ अहमदनगर शाखेने अहमदनगर येथे महाज्योती चे कार्यालय सुरू करावे अशी मागणी केली आहे
राज्याचे सहकार ,इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री नामदार अतुल सावे साहेब यांना मागणी निवेदन देण्यात आले या प्रसंगी जेष्ठ मार्गदर्शक अभीमन्यु उबाळे मामा, माळी महासंघ अहमदनगर जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ बनकर, शेतकरी आघाडीचे राहुल भांबरे, कर्मचारी आघाडी जिल्हाअध्यक्ष नंदकुमार नेमाणे, शहर जिल्हाअध्यक्ष नितिन डागवाले, युवक जिल्हाअध्यक्ष आविनाश शिंदे, उद्योजक आघाडी जिल्हाअध्यक्ष दिनेश बेल्हेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी बोलताना नामदार अतुल जी सावे साहेब बोलले की माळी महासंघ चे पदाधिकारी सदैव समाजाचा सर्वांगीण विकासासाठी प्रचंड मेहनत घेत आहे ही अभिमानास्पद गोष्ट आहे आपली मागणी कॅबिनेट मध्ये मांडून निश्चित पणे मार्गी लागेल असे आश्वासन मंत्री नामंदार अतुल सावे यांनी दिले
