नेप्ती शाळेत चिमुकल्यानी भरवला आनंदी बाजार, बाजारात प्लॅस्टिक मुक्तीचा संदेश .

अहिल्यानगर – नगर तालुक्यातील नेप्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या पटांगणात आनंदी बाजार भरवला होता.
या आनंदी बाजाराचे उद्घाटन समता परिषदेचे तालुकाध्यक्ष रामदास फुले यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे या उद्देशाने मोठ्या उत्साहाने आनंदी बाजाराचे आयोजन केले होते. भाजीपाला विकता विकता या बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी प्लास्टिक मुक्तीचा संदेश दिला व तो ग्रामस्थांना आवडला.
या आनंदी बाजारात फास्ट फूड, पावभाजी, पाणीपुरी, भजे, वडेपाव, पोहे, भेळ, लाडू, चिक्की, – पालक मेथी, शेवगा, वांगी बटाटे कांदे, मटकी, ओला हरभरा, मुग , डाळ, चणा डाळ, हरभरा डाळ शेवगा, कोबी फ्लॉवर, किराणा बाजार, चहा, कॉफी रसरशीत चिंचा, आदीचे स्टॉल लावण्यात आले होते.

यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शिवाजी होळकर, सरपंच संजय जपकर, उपसरपंच दादू चौगुले, फारुक सय्यद,रामदास फुले, दिलीप होळकर, ग्रामपंचायत सदस्य संतोष चौरे ,लक्ष्मण कांडेकर, मुख्याध्यापिका पदमा मांडगे, सुरेश कार्ले, प्रा. एकनाथ होले ,आशा ढोले, नूतन पाटोळे, मीना काटमोरे, निर्मला कांडेकर,शिवांजली कांडेकर, राजश्री कोल्हे ,मंदार लोकरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नानासाहेब होळकर, उपाध्यक्ष रोहिणी चौरे, दत्तात्रय कांडेकर, अमोल चौगुले, लहू फुले, भूषण पवार , राहुल गवारे, भीमराज जपकर, अर्जुन खामकर ,अनिल पवार ,गुलाब सय्यद, गणेश कांडेकर ,दिनेश राऊत ,रफिक सय्यद, पालक महिला , शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेने हा उपक्रम राबवल्याबद्दल केंद्रप्रमुख संजय धामणे विस्ताराधिकारी निर्मला साठे गटशिक्षणाधिकारी बाबुराव जाधव यांनी शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे आभार मानले.
शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना आर्थिक देवाण-घेवाणीचे ज्ञान प्राप्त व्हावे तसेच व्यावसायिक दृष्टिकोन आत्मसात व्हावा यासाठी या बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. विविध वस्तू खाद्यपदार्थ व भाजीपाला खरेदी करण्यासाठी पालक व ग्रामस्थांची झुंबड उडाली होती. पाच ते दहा रुपयात भाज्या मिळत असल्याने मिळत असल्याने ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर खरेदीचा उत्साह पहावयास मिळत होता.