राजुर मध्ये तंत्र प्रदर्शन शिबिर संपन्न

राजुर -: आज ” क्रांतिकारक राघोजी भांगरे शासकीय आयटीआय राजुर, ता. अकोले, जि. अहिल्यानगर ” येथे संस्थेचे प्राचार्य, एस एस कुटे, यांचे मार्गदर्शनाखाली संस्थास्तरीय तंत्र प्रदर्शन संपन्न झाले या तंत्र प्रदर्शन शिबिरात तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था केळी कोतुळ व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मवेशी या संस्था सामील होत्या सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राजुर मधील पोलीस उपनिरीक्षक दीपक सरोदे, तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोदय महाविद्यालयाचे प्राचार्य बी एन ताजणे, हे उपस्थित होते. संस्थेचे गटनिदेशक ए सी नागरे यांनी प्रास्ताविक करताना तंत्र प्रदर्शन मागील संकल्पना तसेच संस्थेत सुरू असलेले विविध व्यवसाय यासंबंधी माहिती दिली. प्रमुख पाहुणे दीपक जी सरोदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपापल्या व्यवसायात विशेष प्राविण्य मिळवून, यश संपादन करा भविष्यकाळात निश्चितपणे चांगल्या प्रकारच्या रोजगाराच्या संधी आपणास उपलब्ध आहेत असे आश्वासित केले. अध्यक्षीय मनोगतातून बोलताना प्राचार्य बी एन ताजने यांनी आयटीआय मधील विद्यार्थी हे भारताचे कुशल असे तंत्रज्ञ आहेत व भारतास औद्योगिक क्षेत्रात पुढे नेण्यासाठी निश्चितपणे आपला मोलाचा सहभाग आहे हे विशेष नमूद केले तंत्र प्रदर्शन मधील मॉडेल पाहण्याकरिता राजुर येथील सर्वोदय महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच राजुर मधील इतर शाळेतील विद्यार्थी यांनी हजेरी लावली हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संस्थेतील सर्व स्टाफ व प्रशिक्षणार्थी यांनी हिरे हिने सहभाग नोंदविला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडलिक एस के यांनी केले व शेवटी के बी गोरडे यांनी केले