कोतुळ येथे सावित्रीबाई फुले यांच्या 194 व्या जयंती सोहळ्याचे आयोजन

अकोले प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कोतुळ तालुका अकोले( जिल्हा अहमदनगर) या विद्यालयात सावित्रीबाई फुले यांचा 194 वा जयंती सोहळा व पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक एस. एम. देशमुख यांनी दिली
बी एस बी एज्युकेशनल संस्था उल्हासनगर संचलित कोतुळ येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात शनिवार दिनांक 4 जानेवारी 2025 रोजी सकाळी ९.३० वाजता सावित्रीबाई फुले जयंती व स्त्री मुक्ती दिन निमित्ताने सावित्रीबाई फुले यांचा जयंती सोहळा व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे
यावेळी प्राचार्य ओंकार बिडवे अडवोकेट पूजा पोखरकर यांचे व्याख्यान होणार आहे या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष उपेंद्र बोऱ्हाडे उपाध्यक्ष सुलभा कदम, सचिव अर्पणा साळुंखे, शिक्षण विस्तार अधिकारी अरविंद कुमावत, केंद्रप्रमुख श्री भोसले कोतूळ गावचे सरपंच भास्कर लोहोकरे उपसरपंच संजय देशमुख यासह ग्रामपंचायत सदस्य व गावातील इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती, माता पालक शिक्षक संघ, तसेच विद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे