शेंडी महाविद्यालयात पद्मभूषण विखेंची पुण्यतिथी साजरी
राजूर प्रतिनीधी,
पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील हे शिक्षण व सहकार क्षेत्रातील दुरदृष्टी असलेले लोकनेते होते. त्यांचा ग्रामीण आदिवासी भागातील शिक्षणाचा कायापालट करण्याचा मनोदय होता.
दिनांक ३० डिसेंबर रोजी लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांचे ५वे पुण्यस्मरण जनसेवा फौंडेशन संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शेंडी येथे साजरे करण्यात आले. या निमित्त प्रा.शांताराम सोनवणे यांचे ‘नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यात व्यावसायिक शिक्षणाला महत्व देण्यात आले असून त्याकरिता कौशल्यविषयक उणीवांचे विश्लेषण व स्थानिक संधीचे मापन होणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी त्यांच्या कार्याची माहिती देतांना त्यांचे शैक्षणिक व सामाजिक जीवनातील स्थान स्पष्ट केले. डॉ.बाळासाहेब विखे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्यामुळे ते त्यांना एकत्र अणु शकले. त्यांनी त्यांना सहकाराशी जोडले व महाराष्ट्रात सहकार चळवळ रुजवली. पिण्याचे पाण्याची व सिंचणाची समस्या सोडवण्यासाठी अनेक योजना तयार करत त्या आणलात आणल्या. तसेच मागील वर्षी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या ‘देह वेचावा कारणी’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रत्येकाने वाचावे असे नमुद केले. या प्रसंगी प्रा.हिरामण जाधव यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे महत्व आपल्या खास शैलीतून पटवून दिले. या प्रसंगी विद्यार्थी महाविद्यालयाचा सर्व स्टाप व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन प्रा.नामदेव बांगर यांनी केले. तर प्रास्तविक प्रा.अनिल डगळे यांनी केले. प्रा.अर्चना बच्छाव यांनी सूत्रसंचालन केले.
