अहमदनगर येथे मी सावित्रीची लेक पुरस्कार वितरण संपन्न

नगर-सावेडीतील स्त्री जन्माचे स्वागत उपक्रमाच्या वतीने दिवंगत विठ्ठल अंभी बुलबुले यांच्या प्रेरणेतून इयत्ता १० वी व १२ वी मध्ये टॉप मार्काने उत्तीर्ण विद्यार्थीनींना मी सावित्रीची लेक पुरस्कार देऊन श्रमिक नगर मधील बालाजी मंदिरात गौरविण्यात आले.यावेळी प्रशांत रेखी पिनॅकल करिअर अॅकडमी, अहमदनगर,पत्रकार सुधीर लंके,लोकमत आवृत्ती प्रमुख, अहमदनगर,नगरसेवक मनोजभाऊ दुलम,फटाका असो अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा,समाजसेविका कल्पना विठ्ठल बुलबुले, विनोद म्याना,अध्यक्ष, श्री श्रमिक बालाजी मंदिर, शंकर येमुल सचिव श्रमिक जनता हौसिंग सोसायटी, डॉ रत्ना नजन,मा उपप्राचार्य एम व्ही गीते,अनिता कोडा,अध्यक्षा, क्रांती असंघटीत कामगार संघटना,अजय म्याना,उप व्यवस्थापक, महावितरण आदी मान्यवरांसह स्त्री जन्माचे स्वागत उपक्रमचे अध्यक्ष नरेश कोटा,उपाध्यक्ष वैभव कंदी , सागर महेसुनी यासह पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनी त्याचे पालक व विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भगवान बालाजी पूजा व आरती तसेच सावित्रीबाई फुले यांचे पूजन करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली प्रथम विठ्ठल बुलबुले याना श्रद्धांजली वाहण्यात आली एकूण ६२ मुलींना हा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी बोलताना पत्रकार सुधीर लंके म्हणाले स्त्री जन्माचे स्वागत उपक्रमाच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात येतात त्यातील हा एक उपक्रम आहे त्यांचे कौतुक केले पाहिजे कि त्यांनी सुकन्या संमृद्धी योजना स्वबळावर सुरु केले आजपर्यँत १५० मुलींचे बँकेत खाते उघडून त्यामध्ये प्रत्येकी १००० रु टाकून ते पासबुक त्या मुलींच्या घरी दिले आहे.
यावेळी प्रशांत रेखी,श्रीनिवास बोज्जा,विनोद म्याना,शंकर येमुल , डॉ रत्ना नजन,प्रा एम व्ही गीते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.गुणवंत मुलींना फेटे बांधून सन्मानपत्र देण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्या एक्कलदेवी यांनी तर आभार वैभव कंदी यांनी तर सूत्रसंचालन प्रकाश कोटा यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी या उपक्रमाध्ये मोलाचे कार्य करणारे कार्यकर्ते विद्याताई एक्कलदेवी, वंदना दडगे, सविता प्रकाश कोटा, प्रशांत वईटला, राहुल दुलम, विनायक क्यातम, तुषार गड्डम, सागर महेसुनी, अक्षय कोंडा, शुभम कोंडा, नितीन एक्कलदेवी, मयुर श्रीगादी, ओंकार श्रीमल, विनायक नागुल, दिगंबर एक्कलदेवी, बालराज श्रीगादी, राजेश दिकोंडा, विशाल कोंडा, संदिप गाजुल, सुरज गाजुल, शुभम पासंकटी, आदेश गेंट्याल आदींनी प्रयत्न केले.