अहमदनगर

बाभुळवाडे नारीशक्ती संमेलन थाटात संपन्न!

सौ.राणीताई लंके यांची उपस्थिती !!

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने 8 मार्च रोजी शिवतेज मित्र मंडळाच्या सभागृहात बाभुळवाडे नारीशक्ती संमेलन थाटात संपन्न झाले.

सुमारे दीडशे महिलांच्या उपस्थितीत झालेल्या या संमेलनाला प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार पत्नी आणि अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. राणीताई लंके यांची खास उपस्थिती होती. मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी तमाम बाभुळवाडेकर महिलांना आपले कार्य कर्तृत्व साकार करण्यासाठी धडाडीने पुढे येण्याचे आवाहन केले. महिलांच्या सक्रिय सहभागातूनच चांगले विकास प्रकल्प मार्गी लागत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. बाभुळवाडे गावच्या विकासकामांना पूर्ण पाठबळ देऊन महिला सक्षमिकरणासाठी आपण कायम प्रयत्नशिल असल्याची ठोस भूमिका सौ. राणीताई लंके यांनी मांडली. संमेलनाला उपस्थित विशेष पाहुणे महाराष्ट्राचे नामवंत वक्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे राज्याध्यक्ष श्री. जितेशदादा सरडे यांनी अतिशय सुंदर प्रेरणादायी भाषण करून उपस्थितांची मने जिंकली. एक उत्कृष्ट वक्तृत्व आणि प्रभावी नेतृत्व कसे असते याचा आदर्श वस्तूपाठ त्यांनी आपल्या भाषणातून घालून दिला.

संमेलनाच्या अध्यक्षस्थानी मा. निलेश लंके प्रतिष्ठानचे बाभुळवाडे अध्यक्ष श्री. गणपतनाना जगदाळे चेअरमन होते. संमेलनाला शिवतेज मित्र मंडळाचे प्रेरणास्थान श्री. दिलीपदादा बोरुडे, आधारस्तंभ श्री. सचिनदादा जगदाळे, मार्गदर्शक श्री. बाबुराव क्षिरसागर सर, शिवतेज कार्याध्यक्ष श्री. जुबेरभाई पठाण, हितचिंतक श्री. शिवाजीतात्या जगदाळे आवर्जून उपस्थित होते. या संमेलनाच्या समारोपात बाभुळवाडे ग्रामपंचायतीचे सदस्य सौ. सविताताई जगदाळे, सौ. निशिगंधाताई बोरुडे, सौ. भावनाताई जगदाळे आणि श्री. प्रमोददादा खणकर यांचा शाल आणि श्रीफळ देऊन खास सन्मान करण्यात आला. संमेलनाच्या संयोजन समितीच्या कार्यशील महिला सदस्या सौ. योगिताताई दातखिळे, सौ. सविताताई खणकर, सौ. अंजुमताई पठाण, सौ. सुरेखाताई बोरुडे, सौ. पुनमताई क्षिरसागर, सौ. कामिनीताई कदम, सौ. अस्मिताताई पंडित, सौ. पुजाताई जाधव, सौ. लताताई आणि मीनाताई बोरुडे यांचा प्रमुख पाहुण्या सौ. राणीताई लंके यांच्या शुभहस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. विविध गीतांचे गायन, महिलांची छोटेखानी मनोगते, उत्स्फूर्त स्पर्धा, प्रमुख पाहुण्यांचा टाळ्यांच्या गजरात झालेला सन्मान सोहळा यामुळे हे संमेलन लक्षवेधी ठरले. संमेलनाचे सूत्रसंचालन शिवतेज संस्थापक कृष्णादादा यांनी केले. सर्व उपस्थितांना साखर, श्रीफळ, लाडू आणि केळीचे वाटप करून उत्साहात या संमेलनाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button