आजचे पंचांग व राशिभविष्य दि.०८/०९/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद १७ शके १९४६
दिनांक :- ०८/०९/२०२४,
वार :- भानुवासरे(रविवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१७,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:३६,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- शरदऋतु
मास :- भाद्रपद
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- पंचमी समाप्ति १९:५९,
नक्षत्र :- स्वाती समाप्ति १५:३१,
योग :- ऐंद्र समाप्ति २४:०५,
करण :- बव समाप्ति ०६:५१,
चंद्र राशि :- तुला,
रविराशि – नक्षत्र :- सिंह – पूर्वा,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- कन्या,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- दु. ०३प. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- संध्या. ०५:०४ ते ०६:३६ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:२२ ते १०:५४ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी १०:५४ ते १२:२७ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०१:५९ ते ०३:३१ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
ऋषिपंचमी, जैन सवंत्सरी, घबाड १९:५९ नं.,
————–
🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
आजचा दिवस सुखाचा जावो मन प्रसन्न राहो!!!!!
💐🌺🌼🌹🌾🍀🌻🌷🌸
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद १७ शके १९४६
दिनांक = ०८/०९/२०२४
वार = भानुवासरे(रविवार)
मेष
काही गोष्टींची तडजोड करावी लागेल. परिश्रमाचे फळ मिळेल. कामातील उत्साह कमी पडू देऊ नका. आरोग्याची काळजी घ्यावी. प्रेमातील व्यक्तीशी सुसंवाद साधता येईल.
वृषभ
गुंतवणुकीसाठी सल्ला महत्त्वाचा. जमिनीच्या कामातून लाभ मिळेल. घरासाठी सजावटीच्या वस्तु खरेदी कराल. मानसिक शांतता लाभेल. तुमचा सल्ला विचारात घेतला जाईल.
मिथुन
कामातील बदल लक्षात घ्या. काही नवीन तांत्रिक बाबी शिकून घ्या. कार्यक्षेत्रात उन्नती साधता येईल. विनाकारण बढाया मारू नका. मेहनतीच्या जोरावर प्रगती करता येईल.
कर्क
नवीन व्यवहार करताना विचार करावा. घरासाठी काही खर्च कराल. कौटुंबिक जबाबदार्या प्राधान्याने पार पाडाल. थोडी काटकसर करावी लागेल. दिवस मध्यम फलदायी.
सिंह
जुने आजार अंगावर काढू नका. व्यापार्यांना हातमिळवणी करावी लागेल. नोकरदारांनी आळस करू नये. कामावर अधिक लक्ष केन्द्रित करावे. वडीलांचे मोलाचे सहकार्य लाभेल.
कन्या
घरात धार्मिक कार्य घडेल. मन उत्साही राहील. मित्रांच्या सहवासात रमाल. काही गोष्टीत तडजोड करावी लागेल. सर्व कामे उत्साहात पूर्ण कराल.
तूळ
कणखरपणा योग्य तिथेच दाखवा. दिवस मनासारखा घालवाल. कामाचा ताण जाणवेल. योग्य ताळमेळ साधता येईल. तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल.
वृश्चिक
कौटुंबिक समतोल राखावा. प्रेम व्यक्त करा. मनाची चंचलता सांभाळावी. कामाच्या बाबतीत हयगय करू नका. समस्यांचे निराकरण शक्य.
धनू
घरातील वातावरण शांत ठेवा. नातेवाईकांकडून अनपेक्षित लाभ मिळतील. तज्ञ व्यक्तींच्या भेटीचा योग. प्रलंबित कामे मार्गी लावा. दैनंदिन कामात टाळाटाळ करू नका.
मकर
घरातील गोष्टींसाठी पैसा खर्च कराल. सामाजिक कामात सक्रिय सहभाग घ्याल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. भावंडांची काळजी लागून राहील. प्रवास जपून करावा.
कुंभ
गुरूजनांचा आशीर्वाद मिळेल. वरिष्ठ अधिकारी पाठिंबा देतील. मन:शांति लाभेल. परोपकाराची जाणीव ठेवून वागाल. इतरांना सढळ हाताने मदत कराल.
मीन
व्यवसायिकांना उत्तम काळ. नवीन घडामोडी घडतील. क्षुल्लक गोष्टींचा त्रास जाणवेल. तडकाफडकी कोणतीही गोष्ट करू नका. मानसिक स्वास्थ्य जपावे.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर