इतर

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्या – सिताराम भांगरे

अकोले प्रतिनिधि

अकोले शहरात सावित्रीबाई फुले वाचनालय अकोले व अकोले तालुका ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील शनी मंदिर परिसरात सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांची १९४वी जयंती साजरी करण्यात आली. फुले दांपत्यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी करत सरकारकडे याबाबत आपण पाठपुरावा करणार असल्याचे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सिताराम भांगरे म्हणाले

प्रथम मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई, महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.


यावेळी माधवराव तिटमे म्हणाले की शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी करणारे आणि देशात, महाराष्ट्रात स्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ह्या दांपत्याने रोवली. अनेक संकटांना तोंड देत, अपमान सहन करीत , आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी वेचणाऱ्या महात्मा फुले यांना त्याकाळी जनतेने ‘महात्मा’ हि पदवी बहाल केली, त्यांचे आचार विचार आणि कार्य सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहिल असे सांगितले.
या प्रसंगी वसंतराव बाळसराफ, संतोष खांबेकर,रामदास पांडे, राम रूद्रे, धोंडिभाऊ राक्षे, प्रमोद मंडलिक यांनी सावित्रीबाई, महात्मा ज्योतिराव फुले दांपत्यास भारतरत्न मिळण्यास ठराव मांडला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून बोलताना भाजपचे जिल्हा सरचिटणीस सिताराम भांगरे म्हणाले की हजारो वर्ष बहुजन समाज गुलामगिरीच्या गतेंत बुडाला होता. जातपात भेद मोठ्या प्रमाणावर वाढले होते, समाज अनिष्ट रूढी परंपरेत बुडालेला होता अशावेळी महात्मा फुले, सावित्रीबाई यांच्या रूपाने समाजाला एक आशेचा किरण दिसला. समाजाला उत्सर्जित अवस्था प्राप्त करून शिक्षणाचे द्वारे खुले केले. फुले दाम्पत्यांना भारतरत्न देण्यासाठी मीही राज्य व केंद्र सरकार कडे पाठपुरावा करील असे सांगितले.

यावेळी धनंजय संत,मच्छिंद्र मंडलिक, दत्ता शेनकर, सुदाम मंडलिक, रमेश नाईकवाडी, अण्णासाहेब घुले, प्रकाशशेठ सासवडे, मुकुंद जुन्नरकर, राजेन्द्र कोळपकर, विलास देशमुख, किरण चौधरी, अर्शद तांबोळी,हरून शेख, जलालुद्दिन शेख, रमेश राक्षे, ज्ञानेश पुंडे, शुभम खर्डे, सुरेश गायकवाड,मच्छिंद्र चौधरी, आदी यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन राम रूद्रे, आभार विजय वाघ यांनी मांडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button