भारतीय मजदूर संघाचे जिल्हा अधिवेशन संपन्न

संघाची नूतन जिल्हा कार्यकारणी जाहीर
अहिल्यानगर दि ५ भारतीय मजदूर संघ अहिल्यानगर जिल्हा त्रैवार्षिक अधिवेशन दिनांक 05/01/2025 रोजी आयुर्वेदिक व्यासपीठ सावेडी, अहमदनगर या ठिकाणी अत्यंत उत्साह पूर्वक वातावरणात संपन्न झाले.
या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे दक्षिण जिल्हा कार्यवाह श्री हिराकांत रामदासी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्तित होते. त्यांनी या वेळी उपस्थितांना मजदूर संघाबाबत मार्गदर्शन केले
. या प्रसंगी पुणे येथून श्री अर्जुन चव्हाण विभाग प्रमुख व सचिन मेंगाळे महामंत्री अखिल भारतीय ठेका महासंघ हे आवर्जून उपस्तित राहिले होते
श्री मेंगाळे यांनी मजदूर संघ स्थापणे पासून आज पर्यंत चा प्रवास उपस्थिततांत् समोर मांडला,या कार्यक्रमासाठी अहील्यांनगर जिल्ह्यातून भारतीय मजदुर संघाशी सलग्न असलेल्या राज्य शासकीय कर्मचारी संघ,महाराष्ट्र वीज कामगार संघ,वीज कंत्राटी कामगार संघ,महाराष्ट्र बँक,सुरक्षा रक्षक महासंघ,अंगणवाडी कर्मचारी,एलआयसी,पोस्ट,रेल्वे,पुरातत्व विभाग,बांधकाम कामगार, औद्योगिक कामगार (MIDC),आरोग्य विभाग,व्ही.आर. डी,संरक्षण विभाग,रेल्वे, एस.टी महामंडळ,नगरपरिषद, नगरपालिका या विभागातील सर्व सभासद उपस्थित होते.
या वेळी पुढील तीन वर्षासाठी नूतन कार्यकरणी घोषित कारण्यात आली. श्री सुजित उदरभरे (अध्यक्ष) ,श्री संजय दुधाने( कार्याध्यक्ष ) तसेच श्री कृष्णा साठे (सचिव) यांची निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारणी मध्ये श्री दिनेश पुसदकर (उपाध्यक्ष). सौ माधुरी देवढे (उपाध्यक्ष,) श्री गणेश कुंभारे (उपाध्यक्ष,) श्री संतोष सुरवसे (संघटन मंत्री),श्री. माणिकराव सोनटक्के (खांजिनदार) अविनाश सिरसूल (प्रसिद्धी प्रमुख) म्हणून यांची पुढील तीन वर्षासाठी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी श्री. राधेश्याम कुलकर्णी, श्री. अशोकराव भोंग, श्री. सुनील मुंगसे, श्री. अशोकराव मुळे, श्री. सर्वोत्तम क्षीरसागर, श्री. प्रदीप भाटे. श्री. सुभाष जगदाळे, श्री. प्रकाश नहार हे सल्लागार व विशेष निमंत्रीत म्हणून उपस्तित होते
कार्यक्रमासाठी संपूर्ण जिल्हा भरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते हजर होते. या वेळी कार्यालय नूतनीकरण करताना सहयोग देणाऱ्या सभासदांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री अतिश डहाणे.सचिन पाटील फारूक शेख अविनाश ओतारी यांनी परिश्रम घेतले…….
———–