शाहू , फुले,आंबेडकरांची नावं घेण्याचा अधिकार महाराष्ट्राने गमावला – संजय सोनवणे

संगमनेरात शांती फाउंडेशन चा पुरस्कार वितरण व पुस्तक लोकार्पण सोहळ्या सम्पन्न
संगमनेर प्रतिनिधी
शाहू , फुले,आंबेडकरांची नावं घेण्याचा अधिकार महाराष्ट्राने गमावला आहे. त्यांची परंपरा, विचारधारा जोपासण्याची गरज आहे ,मात्र वर्तमानात तसे घडताना दिसत नसल्याची खंत विचारवंत संजय सोनवणे यांनी व्यक्त केली ते शांती फाउंडेशन च्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण व पुस्तक लोकार्पण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
ककार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे माजी सदस्य डॉ. सुधीर तांबे होते. यावेळी व्यासपीठावर प्रकाशक व संपादक घनश्याम पाटील, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले,पतित पावन संघटनेचे माजी प्रांताध्यक्ष प्रा.एस झेड देशमुख माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, हिरालाल पगडाल,नामदेव गुंजाळ, फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ मुटकुळे उपस्थित होते.
आपल्या भाषणामध्ये सोनवणी म्हणाले की, वर्तमान परिस्थितीमध्ये विद्रोही कोण ? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. समाजातील वाईट परंपरा सोडून नव्या विचाराकडे झेप घेतो त्याला पुरोगामी असे म्हणतात .आज नवं काही मांडण्याची हिंमत आपण गमावून बसलो आहोत.पुरोगामी शब्दाला काहीच अर्थ उरलेला नाही.. महाराष्ट्र आज पुरोगामी आहे का ? असा प्रश्न पडू लागला आहे.शाहू ,फुले, आंबेडकरांचा महाराष्ट् म्हणतो, पण आज तसे वातावरण आहे का? भारतातील पहिले अर्थतज्ज्ञ म्हणून महात्मा फुले यांचे नाव घ्यावे लागेल. त्यांनी मांडलेल्या वंचिताचे अर्थशास्त्र पुढे घेऊन जायचा प्रयत्न केला गेला नाही. आज सरकारवर कसलाच फरक पडत नाही. शिकण्याचा परिणाम माणसाच्या जीवनात दिसत नाही. बहुजन समाजामध्ये
अभ्यास आणि विचार करण्याची प्रवृत्ती कमी झाली आहे. प्रगल्भ करते ते शिक्षण.सावित्रीबाईचे काम आज विसरले आहोत. त्यांच्या विचारांची कास धरून पुढे जाणं घडत नाही.
परिवर्तन हवे असे म्हणतो मात्र त्यासाठी करत काहीच नाही.. माणसं परिवर्तनवादी नाहीत.परिवर्तावर केवळ त्यांची श्रद्धा आहे. देशाची स्थिती चिंताजनक आहे.
भारताचा नवा इतिहास लिहिणार्या समितीत एक ही महिला नाही.त्यामुळे
पुढची पिढी काय शिकणार ? याची काळजी नाही.. शाहू फुल्यांचे नाव घेण्याचा अधिकार आपल्याला नाही.आज
सामाजिक चित्र बदलले आहे. जातीयतेचा विचार उंचावत आहे.. संताची चळवळ संमतेची होती.
आम्ही घटनेच्या तत्त्वाचा नाश केला आहे. घटनेच्या तत्त्वाचे पालन करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे.

बुद्धी भ्रष्ट करण्याचे काम चालू आहे.समाजाला धर्मांद बनवायचं काम चालू आहे.वंचितांना मदत करा पण केवळ मतासाठी योजना म्हणजे लोकशाहीची हत्या आहे.वर्तमानात
कौशल्य शिक्षणाची गरज आहे.आज शिक्षण आहे पण कौशल्य नाही.. जागतिक करणानतर आपण सारेच उथळ झालो आहोत.विचारशुन्यता आली असल्याची खंत व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. तांबे म्हणाले की, समाजामध्ये चांगले काम करणाऱ्या माणसांची अधिक गरज आहे. ती माणसं वाढली तर समाजाला आकार मिळेल. पुरस्कार देऊन समाजातील चांगुलपणा जोपासण्याचे काम करत असल्याचे गौरव उद्गार त्यांनी काढले. समाजातील चांगल्या विचाराची कास धरून मार्गक्रमण करण्यासाठी सातत्याने प्रयत्नांची गरजही त्यांनी व्यक्त केली. घनश्याम पाटील म्हणाले की, सोमनाथ मुटकुळे यांनी लिहिलेली नाटकं म्हणजे समाजामध्ये महापुरुषांच्या विचाराची पेरणी आहे.कलेच्या माध्यमातून त्यांनी समाजामध्ये चांगला विचार पेरण्याचे काम केले आहे. समाजामध्ये घडणाऱ्या वाईट गोष्टी प्रहार करण्याचे काम केले आहेत. त्यामुळे ही नाटके काळाच्या पुढे जाताना दिसता आहेत. वाचक आणि रसिक यांचे स्वागत करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मुटकुळे यांच्या तीन नाटकांचे लोकार्पण करण्यात आले. पत्रकार संदीप वाकचौरे,प्रा. विठ्ठल शेवाळे ,तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, डॉ. राजेश आहेर यांना विविध क्षेत्रात केलेल्या कामाबददल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी वसंत बंदावणे यांनी निर्मिती केलेली डॉ. मुटकुळे यांच्या जीवनावर आधारित लघुपट प्रदर्शित करण्यात आला.
उपस्थितांचे स्वागत सूर्यकांत शिंदे यांनी केले. डॉ.श्रीमती शिवानी मुटकुळे यांनी प्रास्ताविक केले. आभार डॉ. पोखरकर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी प्राचार्य हर्षवर्धन देवचक्के यांनी केले.
कार्यक्रमास नानासाहेब खर्डे, दत्तात्रय आरोटे, रामहरी कातोरे,प्रा.शरद सावंत,प्रा राजेंद्र वामन, डॉ.संदीप आरोटे,प्रा.शिवाजीराव कल्हापुरे,प्रमोद येवले ,शांताराम डोंगरे, सुखदेव वर्पे, गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे , दिनेश भाने, अनिल सोमणी, वंदना जोशी, मदन महाराज विलास वर्पे,
दत्तू भाऊ वर्पे, सी के मुटकुळे , संदीप वलवे , आनंद वर्पे
कचरू भालेराव , भाऊसाहेब पानसरे , सखाराम राऊत ,
भाऊ खरात , शिवाजी बोरुडे , डी आर वामन , प्रदीप घुले ,
भारती साबळे प्रकाश फटांगरे , निरंजन देशमुख , डॉ शेळके ,डॉ.फटांगरे डॉ.अमित शिंदे ,डॉ. अमोल वालझाडे डॉ.गीते , सूर्यभान वर्पे, डॉ.घुले , अर्जुन वर्,पे ,भुजबळ पांडुरंग वर्पे
भाऊसाहेब हासे , कॉम्रेड बापूसाहेब हसे , निकम संख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शांती फाऊंडेशनचे पदाधिकारी व नाट्यकर्मी यांनी विशेष प्रयत्न केले.