इतर

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात जयंती निमित्त मोफत तीन दिवस मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिर



संगमनेर /प्रतिनिधी-

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती महोत्सवानिमित्त संगमनेर मध्ये स्वर्गीय डॉक्टर शरद कुमार दीक्षित अमेरिका यांच्या स्मरणार्थ लायन्स क्लब ऑफ संगमनेर यांच्या वतीने 11 12 व 13 जानेवारी 2025 रोजी मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख डॉ सुचित गांधी व डॉ. प्रवीण पानसरे लायन्स क्लबच्या अध्यक्षा राखी करवा यांनी दिली आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारातून संगमनेर तालुक्यात समृद्धी निर्माण केली आर्थिक शिस्त विकासाची परंपरा घेऊन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्याला वैभवशाली बनवले आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी संगमनेर मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन होते.

यावर्षी ही जयंती व डॉ शरद कुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ लायन्स क्लब ऑफ संगमनेर व सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात जयंती महोत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत प्लास्टिक सर्जरी 11 12 व 13 जानेवारी रोजी  डॉ प्रवीण पानसरे यांचे धन्वंतरी हॉस्पिटल येथे होणार आहे.

या मोफत प्लास्टिक शिबिर सर्जरी मध्ये दुबगलेले ओठ व टाळू ,नाक व कान यावरील बाह्य विकृती. तसेच जन्मता फाटलेले ओठ व टाळूंच्या शस्त्रक्रिया, छोटे कान ,तिरपे नाक तिरपी हानवुटी इत्यादीसाठी मोफत तपासणी व शस्त्रक्रिया होणार आहे.

या शस्त्रक्रियांसाठी डॉ. शरद कुमार दीक्षित यांच्या समवेत काम केलेले अमेरिकेतील त्यांचे सहकारी डॉ लेरी व्हेन स्टेन, डॉ .बैरी सिट्रोन ,डॉ.लेडीज ब्रेन, डॉ लिंडा पीटरसन व त्यांचे सहकारी येणार आहे.

अमेरिकेहून संगमनेर मध्ये येऊन अनेक डॉक्टर रुग्णांची मोफत सेवा करणार असून या मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन लायन्स क्लबचे अध्यक्ष राखी करवा, सचिव डॉ.अबोली गांधी ,खजिनदार ला.श्वेता जाजू, श्रीनिवास पगडाल ,डॉ. सुचित गांधी, डॉ प्रवीण कुमार पानसरे ,डॉ.जयश्रीताई थोरात पाटील सह विविध मान्यवरांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button