नवरदेव चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला !

नवरदेव चित्रपटाचे अकोल्यात होणार उदघाटन
अकोले प्रतिनिधी
शेतकरी बांधवांच्या जीवनावर आधारित असलेला नवरदेव चित्रपट नव्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे नव्या वर्षात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे या चित्रपटाचा पहिला शो चे उदघाटन अगस्ती चित्र मंदिर अकोले येथे 9 जानेवारी 2025 रोजी होणार आहे.
अकोल्याच्या भूमीपुत्रांनी बनविलेल्या चित्रपटाला जास्तीत जास्त लोकांनी साथ द्यावी असे आवाहन निर्माता निरंजन देशमुख यांनी केले आहे
अकोल्या बरोबरच, नाशिक पुणे येथील कलाकारांनी चित्रपटात काम केले असून चार गाण्यांचा समावेश असलेला हा चित्रपट दोन तास वीस मिनिटांचा आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपटाशी संलग्न असलेल्या कोतुळेश्र्वर वार्ता चित्रपट निर्मिती संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन पत्रकार निरंजन देशमुख यांनी केले आहे, महाराष्ट्राचे लाडके गायक श्री. सोनू साठे आणि रोहित पाटील यांनी चित्रपटात गाणे गायले आहे. चित्रपटाचे पोस्ट प्रोडक्शन चे सर्व काम पुणे येथील एम के स्टुडिओत झाले आहे.
शेतकरी मुलांच्या लग्नाच्या ज्वलंत प्रश्नावर आधारित नवरदेव चित्रपट असून चार वर्ष त्यांनी या चित्रपटाची निर्मिती साठी लागले आहेत.
9जानेवारी 2025 रोजी अकोले येथील अगस्ती चित्र मंदिर मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे
महाराष्ट्रातील सिनेमागृहांमध्ये टप्प्याटप्प्याने प्रत्येक थेटरला चित्रपट प्रदर्शित करण्याचा संकल्प त्यांचा आहे. .
अतिशय संघर्षातून सामान्य कुटुंबातील तरुणाने जिद्दीने तळमळीने हा चित्रपट पूर्ण केला आहे. चित्रपटाची कथा स्वतः त्यांनी लिहिली आहे, गाणी सुद्धा त्यांनीच लिहिली आहेत, आणि चित्रपटाचे दिग्दर्शन देखील त्यांनी स्वतःच केले आहे.शेतकऱ्यांच्या या चित्रपटाला निश्चितच प्रेक्षक वर्ग साथ देऊन नवरदेवाला आशीर्वाद देतील असा आत्मविश्वास निर्माता श्री निरंजन देशमुख यांनी व्यक्त केला आहे.