माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून डिग्रस येथील जळीत झालेल्या कुटुंबास मदत
मा. मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून डिग्रस येथील जळीत झालेल्या कुटुंबास मदत
संगमनेर /प्रतिनिधी–
एक तालुका एक परिवार ही संकल्पना राबवून काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाला मोठी मदत केली आहे ज्यावेळेस तालुक्यातील कोणत्याही कुटुंबावर संकट येते अशावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे पाठीशी भक्कमपणे उभे राहत असून आज डिग्रस येथील झोपडीला आग लागून जळीत झालेल्या बर्डे कुटुंबीयांना मदतीसाठी तातडीने किराणा व गृह उपयोगी साहित्य देण्यात आले
डिग्रस येथील सौ.लता गीताराम बर्डे या आदिवासी महिलेच्या झोपडीला आग लागून सर्व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले . ही घटना कळताच काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्रीबाळासाहेब थोरात यांनी आपल्या यशोधन कार्यालयातील यंत्रणेमार्फत आदिवासी सेवक बाबा खरात यांना तातडीने किराणा व गृहउपयोगी साहित्य बर्डे कुटुंबीयांच्या मदतीसाठी पाठवले
यावेळी आदिवासी सेवक प्रा बाबा खरात म्हणाले की, घराला आग लागून लताबाई बर्डे यांचे पूर्ण संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे .गरीब कुटुंबावर अचानक असे संकट आले तर ते कुटुंब वाऱ्यावर पडते .मात्र ज्या ज्या वेळेस अशा कुटुंबावर संकट येतात अशावेळी मा. मंत्री बाळासाहेब थोरात या संकटात धावून येतात.
तालुक्यात प्रत्येक कुटुंबाच्या सुखदुःखाचे नेहमी सहभागी होत असतात. मागील आठवड्यामध्ये सावरगाव घुले व जांबुत येथे जळीत झालेल्या कुटुंबीयांनाही तातडीने यशोधनमार्फत किराणा व गृह उपयोगी साहित्य देण्यात आले. अशा अडचणीत आलेल्या कुटुंबीयांना तातडीची मदत गरजेची असते. याचबरोबर या कुटुंबाला विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून प्रयत्न करू असे प्रा.बाबा खरात यांनी म्हटले .
तर यावेळी लताबाई बर्डे म्हणाल्या की माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे गोरगरिबांच्या मदतीला काही धावून येत असतात. माझ्यावर हे संकट आले ही बातमी त्यांच्या कानावर गेली आणि त्यांनी मला मदत पाठवली. ते गावातही आले की अगदी आवर्जून सर्व गोरगरिबांना भेटतात. तेच आमच्या गरीब जनतेचे मायबाप सरकार आहे.