हिंदू धर्माला काही शक्ती कडून जाणीव पूर्वक बदनाम करण्याचे प्रयत्न- शंकर गायकर

कोतुळ प्रतिनिधी
हिंदू धर्म व हिंदुत्व यांना काही शक्ती कडून जाणीव पूर्वक बदनाम करण्याचे प्रयत्न चालू आहेत हे थांबले पाहिजे अन्यथा गंभीर परिमाण भोगावे लागतील असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय सहमंत्री शंकरजी गायकर यांनी केले.
कोतूळ(ता.अकोले) येथे आयोजित विशाल हिंदू धर्म जागृती सभेत गायकर बोलत होते
.अध्यक्षपदी माजी मंत्री मधुकर पिचड होते. या वेळी व्यासपीठावर देवगड येथील दत्त देवस्थान चे महंत भास्कर गिरी महाराज,बजरंग दलाचे मुबई क्षेत्र मंत्री विवेक कुलकर्णी, विहिंप चे देवगिरी प्रांत धर्माचार्य संपर्क प्रमुख जनार्धन महाराज मेटे,ह.भ.प.बाळासाहेब महाराज कोंढार, माजी आमदार वैभव पिचड आदी उपस्थित होते.
देशात गल्ली बोळात रावण प्रवृत्ती बळावत असून त्याला संपविण्या साठी मना मनातील राम आपणाला जगवावा लागेल, त्यासाठी हिंदुत्व समजावून घ्यावे लागेल झोपलेल्या समाजाला जागृत करणे, संतानी आखलेल्या मार्गदर्शनानुसार हरवलेल्या समाजाचा राष्ट्राचा अभिमान आहे. झोपलेल्या समाजाला जागृत करणे, आपल्या सत्त्वगुण अस्मितेची ओळख करून देणे, संघर्ष करत पुढे जाणे हे हिंदुत्वाचे लक्षण आहे. आपल्या सत्त्वगुण अस्मितेची ओळख करून देणे, संघर्ष करत पुढे जाणे हे महानतेचे लक्षण आहे जगणारे जीवन हेच राष्ट्र आहे, तोच धर्म आहे, तेच सत्य आहे, आराधने बरोबर राष्टाची चिंता करणार्यांना संत म्हणतात ते पिढ्यानपिढ्या स्मरणात राहतात. गायकर यांनी दिला.
हिंदू धर्म हा कोणत्याही धर्माचा द्वेष करीत नाही मात्र काही जाणीवपूर्वक हिंदू द्वेष करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांना परमेश्वराने सद्बुद्धी द्यावी असे आवाहन देवगड येथील दत्त देवस्थान चे महंत भास्कर गिरी महाराज यांनी केले.
अकोले तालुक्याला प्राचीन इतिहास आहे आपल्या पूर्वजांनी दहाव्या शतका पासून जे विचार चालू ठेवले ते वेडे नव्हते मात्र सध्या चुकीची विचार समाजाला सांगणाऱ्या मुकाबला करून आपल्या संस्कृतीचे जतन करावे असे मत माजी मंत्री मधुकर पिचड यांनी व्यक्त केले.
मनातील हिंदू जागा करण्यासाठी प्रभू रामचंद्राचा आदर्श आचरणात आणून हा पूर्वीचे अखंड हिंदू राष्ट्र निर्माण व्हावे आशी आशा माजी आमदार वैभव पिचड यांनी व्यक्त केली.
यावेळी शंकर गायकर यांची विश्व हिंदू परिषदेच्या राष्ट्रीय सहमंत्री म्हणून तर माजी मंत्री मधुकर पिचड यांना सावित्रीबाई फुले पुणे विधापीठा च्या वतीने जीवन साधना गौरव पुरस्कार मिळाल्या बद्दल महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला .
प्रारंभी कोतूळ गावातून महंत भास्करगिरी महाराज यांनी भव्य शोभा यात्रा काढण्यात आली, ठिकठिकाणी नागरिकांनी त्यांचे स्वागत केले.
प्रास्ताविक प्रदीप भाटे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय पवार, किशोर आरोटे, रोहित चोथवे, मयूर आरोटे, विशाल बोऱ्हाडे, मनोज लोखंडे, प्रसाद जंगम, जय बोऱ्हाडे, महेश पोखरकर, गणेश पोखरकर, आदींनी विशेष प्रयत्न केले.
यावेळी विहिप चे नवी मंबई जिल्हा मंत्री लालचंद मलिक,कुलाबा जिल्हा सह मंत्री सतीश देशमुख,पुणे जिल्हा मंत्री संतोष खामकर,नगर जिल्हा सह मंत्री विशाल वाकचौरे यांच्या सह भाजपचं जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर,पतित पावन संघटनेचे प्रांत अध्यक्ष प्रा.सोपानराव देशमुख, कोरठन खंडोबा देवस्थानचे माजी अध्यक्ष पांडुरंग गायकवाड, जेष्ट नेते गिरजाजी जाधव, भाजपा महिला जिल्हा अध्यक्ष सोनालीताई नाईकवाडी, तालुका अध्यक्ष सिताराम भांगरे, अमृतसागर दूध संघाचे व्हा.चेअरमन रावसाहेब वाकचौरे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, अकोले ता.एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर, सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, भाजप युवा अध्यक्ष राहुल देशमुख, हभप.रामनाथ महाराज जाधव ,दिपक महाराज देशमुख,राजेंद्र महाराज नवले, नितीन महाराज गोडसे, दत्ता महाराज भोर, गणेश महाराज वाकचौरे, अरुण महाराज शिर्के, मिनानाथ महाराज लोहकरे,सोमनाथ महाराज भोर, नगरसेवक शरद नवले,विजय पवार,सागर चौधरी, हितेश कुंभार, रवी शेणकर,नवनाथ मोहिते आदीसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.