अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल

संजय साबळे/संगमनेर प्रतिनिधी
स्वदेश उद्योग समूहाचे संस्थापक बाळासाहेब देशमाने हे इंदिरा नगर परिसरात गणेश आरतीसाठी गेले असता येथील नागरिकांनी सदर परिसरामध्ये बिबट्याचे वाढते वास्तव्य ही भीतीदायक गोष्ट सांगितली सदर परिसरात 35 ते 40 कुटुंब या परिसरात राहतात अनेक लहान मुलं सायंकाळी बिबट्याच्या भीतीपोटी बाहेर पडत नव्हती या परिसरात विद्युत दिव्यांची अत्यंत गरज आहे अशा प्रकारची मागणी मधील ग्रामस्थांनी बाळासाहेब यांच्याकडे केले याच वेळेस परिसरातील नागरिकांना गणपती बाप्पा आपल्या परिसराला प्रकाशमान करण्याचे नक्कीच काम माझ्या माध्यमातून करणार आहे म्हणूनच आज स्वदेश सेवाभावी संस्था व उद्योग समूहाच्या वतीने अंधारलेल्या भागाला प्रकाशमान करण्याचे कार्य इंदिरानगर परिसर धांदरफळ बुद्रुक ठिकाण या ठिकाणी झालेला आहे परिसरातील नागरिकांनी या कार्याबद्दल धांदरफळ बुद्रुक ची भूमिपुत्र बाळासाहेब देशमाने साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले येथील युवकांनी साहेब तुम्ही प्रकाशमान नेतृत्व आहात अशा प्रकारचे गौरव उद्गार या ठिकाणी आपल्या समस्याला पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला प्रकाशमान नेतृत्व अशा प्रकारचे गौरव उद्गाराने त्यांना सन्मानित केले या सामाजिक कार्यातूनच स्वदेश उद्योग समूहाची ओळख बाळासाहेबांची धांदरफळला असलेले सामाजिक कार्याची नाळ आपल्या माणसांसाठी आपला माणूस सदैव समाजाच्या सेवेसाठी माझं गाव माझा अभिमान हा शब्द समाजसेवेतून पूर्ण होतो याचे उत्तर आजच्या कार्यातून धांदफळकरांना मिळत आहे समस्या कोणतीही असो या समस्याच उत्तर बाळासाहेबांच्या सामाजिक कामातून दिसून येत आहे