इतर

पारनेर साखर कारखाना विक्री गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करा…पारनेर न्यायालयाचा आदेश

दत्ता ठुबे

पारनेर : देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखाना बेकायदा विक्री केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मुंबई आणि क्रांती शुगर अँड पावर प्रा.लि. पुणे या खाजगी कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पारनेर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश राहुल देशपांडे यांनी दिले आहेत.


पारनेर सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता विक्री करण्यासाठी राज्य सहकारी बँकेने साडेचौदा कोटी रुपये कर्जाचे एक बनावट गहाणखत तयार करून कारखान्यावर कर्जाचा फुगवटा निर्माण केला होता. व त्यानंतर कारखान्याची विक्रीची बेकायदा प्रक्रिया पुर्ण केली. या कारखान्याचा विक्री साठी केवळ पाचशे रुपये मुद्रांक शुल्क देऊन सुमारे दीड कोटी रुपयांचा महसूल बुडवला होता. ज्या दिनांकास कारखान्याची विक्री केली त्याच दिनांकास क्रांती शुगर या खरेदीदार कंपनीला कारखाना विकत घेण्याकरीता त्याच मालमत्तेवर गहाणखत घेवून कर्ज पुरवठा केला . कारखाना विक्रीच्या खरेदीखताला बोजा नसलेला बनावट सातबारा जोडण्यात आला. कारखाना विकत घेण्यासाठी वापरलेला कोट्यावधी रुपयांचा काळा पैसा पांढरा करण्याकरता क्रांती शुगर या कागदोपत्री कंपनीचा वापर करण्यात आला. पारनेर साखर कारखान्याची मालमत्ता केवळ 32 कोटी रुपयांना विकत घेऊन त्याच मालमत्तेवर सुमारे 300 कोटी रुपयांचे कर्ज काढले. पारनेर साखर कारखाना विक्रीतुन कर्ज वजा जाता
उरलेली सुमारे साडे बारा कोटी रुपये बॅकेने कारखान्याला परत केली नाही. सध्या कारखाना उभा असलेली दहा हेक्टर औद्योगिक बिगरशेती जमीन राज्य सहकारी बॅकेकडे तारण नसताना विकली.


पारनेर कारखाना विक्रीच्या या सर्व गैरव्यवहारांबाबत कारखाना बचाव व पुनर्जीवन समितीने सतरा हजार सभासदांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे याचिका दाखल केली होती. औरंगाबाद खंडपीठाने सदर याचिकेवर निर्णय घेण्याचे अधिकार हे पारनेर न्यायालयाच्या कक्षेत येत असल्याचे सांगून याचिका निकाली काढली, त्यानंतर उच्च न्यायालयाच्या सूचनांप्रमाणे कारखाना बचाव समितीने पारनेर न्यायालयात विक्रीतील दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे याचिका दाखल केली होती. पारनेर न्यायालयासमोर या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर कारखाना विक्रीतील दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. विक्री प्रक्रियेत गैरव्यवहार केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आलेला होता, त्या आरोपांची पडताळणी केल्यानंतर न्यायालयाने पारनेर पोलिसांना फिर्यादीच्या अर्जाप्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयासमोर कारखाना बचाव समितीच्या वतीने अँड. रामदास घावटे, अँड. उन्मेश चौधरी यांनी बाजू मांडली.

पारनेर सहकारी साखर कारखान्याची, शेतकरी,सभासदांची कोट्यावधी किमतीची सार्वजनिक मालमत्ता महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने गैरमार्गाचा वापर करून विक्री केली आहे. या प्रकरणात राज्य सहकारी बँकेचे दोन अधिकारी, क्रांती शुगर कंपनीचे नऊ संचालक व देवीभोयरेचा तत्कालीन तलाठी यांचा
आरोपींत समावेश आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पोलिसांनी पालन करून आरोपींचे विरुद्द गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करण्याची मागणी करणारे निवेदन पारनेर पोलिसांना देत आहोत.

  • बबनराव कवाद,साहेबराव मोरे
    ( कारखाना सभासद )

जवळेत सभासदांचा जल्लोश…!
पारनेर साखर कारखाना विक्रीतील दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश होताच जवळे येथील ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांनी फटाके फोडुन,पेढे वाटून जल्लोष साजरा केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button