अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा. संदीप वाघ यांची मागणी

दत्ता ठुबे
पारनेर:-गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून पारनेर तालुक्यातील ढवळपुरी तसेच परिसरातील वाड्यांवर अनेक ठिकाणी मोठया प्रमाणात वादळी गारपीट झाली आहे .त्यामुळे अवकाळी गारपिटीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.या पावसाने कांदा, गहू, हरभरा, डाळिंब ,आंबा या काढणीला आलेल्या पिकांचे तसेच चारपिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.आधीच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही, त्यात काढणीला आलेली सर्व पिके हातातून निघून चालल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.त्यामुळे तातडीने नुकसान झालेल्या परिसराचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य श्री संदीप वाघ यांनी तालुका कृषी अधिकारी श्री विलास गायकवाड यांच्याकडे केली आहे.यावेळी श्री गायकवाड साहेब यांनी सोमवारपासून कृषी विभागाचे अधिकारी नुकसानीची पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे दूरध्वनीवर बोलताना सांगितले.या नुकसानीची माहिती पारनेर नगर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनासुद्धा दिली असल्याची माहिती संदीप वाघ यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
