डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्ताने शहीद मानवंदना

प्रतिनिधी
डॉ शाम जाधव
दिनांक १४/१/ २०२५ रोजी सायंकाळी ७ वा.
वाजता बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त व नामांतरणासाठी शहीद झालेल्या शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले
कार्यक्रमास श्रावस्ती विहाराचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर कोलप आयुष्यामध्ये कांबळे ताई ज्येष्ठ सदस्य बोरखडे मामा यांनी सर्वप्रथम आपले आदर्श महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध आणि विश्वभूषण विश्वरत्न सिम्बॉल ऑफ नॉलेज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प धूप दीप प्रज्वलन केले.विहाराचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर कोलप यांनी सर्व प्रथम प्रास्ताविक केले, त्यानंतर त्रिसरण पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
विहाराचे सदस्य चंद्रकांत नागवंशी सर यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त थोडक्यात माहिती सांगितली आणि शहीद झालेल्या सर्व शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. ज्या वेळी नामांतर आंदोलन सुरू होते .शहीद झालेले वीरांची नावे सांगितली नामांतर आंदोलनातील
शहीद भीमसैनिक:- गौतम वाघमारे, पोचिराम कांबळे,अविनाश डोंगरे, दिलीप रामटेके, रोशन बोरकर, ज्ञानेश्वर साखरे,डोमाजी कुत्तरमारे, चंदर कांबळे,जनार्दन मवाळे, शब्बीर अली काजल हुसैन, रतन मेंढे,सुहासिनी बनसोड,नारायणगायकवाड अब्दुल सत्तार, दिवाकर थोरात, जनार्दन मस्के,भालचंद्र बोरकर, शीला वाघमारे,प्रतिभा तायडे,गोविंद भुरेवार,शरदपाटोळे,मनोज वाघमारे, कैलास पंडित, रतन परदेशी
त्यानंतर विहाराचे संचालक सी.बी. चौधरी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबाद येथे स्वतःच्या खर्चाने जमीन खरेदी करून त्या ठिकाणी महाविद्यालय बांधून मराठवाडा येथील सर्व विद्यार्थ्यांची सोय केली. मराठवाडा हा विभाग हैदराबाद संस्थांच्या निजाम काळात जोडलेला होता त्यामुळे दहावीच्या शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना पदवीचे शिक्षण घेण्यासाठी हैदराबाद येथे जाऊनच शिक्षण पूर्ण करावया लागत असे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेबांनी हा हा त्रास वाचवण्यासाठी महाविद्यालय बांधून सर्व मराठवाडा येथील विद्यार्थ्यांची सोय केली.
त्यानंतर विहाराचे सह खजिनदार जगन्नाथ आठवले यांनी मराठवाड्यातील नामांतर लढ्याबाबत वस्तू स्थितीदर्शक सविस्तर माहिती सांगितली त्यानंतर अंकली येथील विहाराचे सदस्य यांनी नामांतर लढ्यासाठी नामदार रामदास आठवले प्राध्यापक करून कांबळे आदरणीय राजा ढाले आदरणीय नामदेव ढसाळ तसेच जोगेंद्र कवाडे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी मोठा एकत्रित लढा दिला तसेच तिसरी बौद्ध धम्म परिषद अंकली येथे भरवली गेली होती त्यासाठी विहाराचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सुधीर कोलप यांनी नुसते मार्गदर्शन केले नाही तर आर्थिक मदत ही केली त्यासाठी त्यांचे योगदान आणि सहकार्य वेळोवेळी होते म्हणून शाल बुके देऊन सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे विहारास वेळोवेळी दान देणारे आयुष्यमान अमोल सरकार यांनी जमा होणारी नाणी रक्कम रुपये.१०००/- इतके दान त्यांची सुकन्या व सुविधा पत्नी यांच्या हस्ते अध्यक्ष व सह खजिनदार यांना सुपूर्त केले. विहाराचे सदस्य आयुष्यमान शंतनू कांबळे यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन लढ्यामध्ये शहीद झालेल्या वीरांना आदरांजली गीत म्हटले.
त्यानंतर धम्मपालन गाथा होऊन कार्यक्रमाची सांगता झाली सदर कार्यक्रमास विहाराचे सल्लागार आदरणीय संजिव साबळे सर बोरखडे मामा अमोल सरकार व त्यांच्या सुविध पत्नी कन्या तसेच इतर माता बंधू भगिनी भारत कदम अंकलीचे अँक्सयटी कोलप, व इतर सदस्य प्राध्यापक नरवाडे सर, उषाताई कांबळे ताई व त्यांच्या कन्या इत्यादी उपस्थित होते