इतर

कोरठण खंडोबा देवस्थान यात्रोत्सवाची सांगता, लाखो भाविकांचे खंडोबा दर्शन

दत्ता ठुबे

पारनेर -पिंपळगाव रोठा ता पारनेर येथील राज्यभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थानच्या तीन दिवसांच्या वार्षिक यात्रोत्सवाची बुधवारी यात्रेच्या मुख्य व शेवटच्या दिवशी ब्राम्हणवाडा ( ता. अकोले ) व बेल्हे ( जि.पुणे ) येथील मानाच्या काठ्यांच्या मिरवणुकीनंतर या काठ्यांच्या हजारो भाविकांच्या उपस्थितीत शासकीय महापुजेनंतर काठ्यांच्या देवदर्शन व कळस दर्शनानंतर इतर गावच्या मानाच्या काठ्यांच्या मिरवणुकीनंतर शांततेत व उत्साहात सांगता झाली यात्रेनिमित्त काही लाख भाविकांनी खंडोबाचे दर्शन घेतले.


पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या सकाळी खंडोबाची चांदीची पालखी व अळकुटी,बेल्हे,कांदळी, माळवाडी, सावरगांव घुले कासारे कळस येथील मानाच्या पालख्यांची मंदिर प्रदक्षिणा मिरवणूक सुरू झाली ही मिरवणूक दुपारी मंदिरासमोर आल्यानंतर पालखी मानकर्याचा देवस्थानकडून सन्मान करण्यात आला दुपारी १ वा. यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या बेल्हे व ब्राम्हणवाडा येथील मानाच्या काठ्यांची शाही मिरवणूक सुरू झाली या मिरवणूकीत हजारो भाविकांची गर्दी झाली होती दुपारी तीनच्या सुमारास दोन्ही काठ्या मंदिरासमोर आल्यानंतर पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांच्या हस्ते काठ्यांची शासकीय महापुजा व महाआरती करण्यात आली या प्रसंगी देवस्थानच्या अध्यक्षा शालिनी घुले उपाध्यक्ष महेश शिरोळे, जेष्ठ विश्वस्त अ‍ॅड पांडुरंग गायकवाड तुकाराम जगताप, जालिंदर खोसे, राजेंद्र चौधरी, चंद्रभान ठुबे,सुरेश फापाळे,रामदास मुळे,धोंडीभाऊ जगताप,कमलेश घुले,अजित महांडुळे, सुवर्णा घाडगे ,दिलीप घुले,महादेव पुंडे,माजी सरपंच अशोक घुले,सरपंच सुरेखा वाळुंज बाजार समितीचे सभापती बाबाजी तरटे संजय वाघमारे गोपीनाथ घुले अमर गुंजाळ यांच्या सह हजारो भाविकांचा जनसागर उपस्थित होता

शासकीय महापुजा व महाआरतीनंतर ब्राम्हणवाडा काठीने देवदर्शन तर बेल्हे काठीने कळस दर्शन घेतले यानंतर इतर गावच्या मानाच्या काठ्यांच्या मिरवणुका पार पडल्या यात्रे दरम्यान मुंबई, ठाणे, नाशिक, नगर, संगमनेर,जुन्नर,अकोले येथील मोठ्या संख्येने भाविक कोरठणला आले होते सर्वाधिक भाविक पुणे जिल्ह्यातून आले होते पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता भाविकांच्या सोयीसाठी एस टी कडून जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या.आरोग्य विभाग यांनीही चोख व्यवस्था ठेवली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button