इतर

जोर्वे येथील संजय इंगळे यांचे अपघाती निधन

संगमनेर (प्रतिनिधी)–जोर्वे येथील माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक संजय दत्तू इंगळे यांचे अपघाती निधन झाले असून त्यांच्या निधनाने जोर्वे परिसरात मोठी हळहळ पसरली आहे. मृत्यू समयी ते 51 वर्षाचे होते.

अत्यंत धार्मिक आणि मनमिळावू स्वभाव असलेले दत्तू इंगळे आपल्या कामानिमित्त कोपरगाव कडे जाणले होते. त्यांना राजणगाव देशमुख येथे  पांढरा रंगाची ईरटीका MH-12uc 7718 कारने धडक दिली .या कारमध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या अपघाती निधनाने इंगळे परिवारावर मोठे संकट कोसळले आहे .संजय यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, दोन मुले, भाऊ, भाऊजयी असा मोठा परिवार आहे.

त्यांच्या निधनानंतर जोर्वे येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. जयश्रीताई थोरात, इंद्रजीत भाऊ थोरात, सुरेश थोरात, शेतकी संघाचे मॅनेजर अनिल थोरात यांनी सांत्वन पर भेट घेऊन दुःख व्यक्त केले आहे.

युवक कार्यकर्त्याच्या आकस्मात झालेल्या  निधनाने जोर्वे परिसरात मोठी शोककळा पसरली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button