इतर
पत्रकार संवाद यात्रेच्या पोस्टरचे माजी मंत्री, आ.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते प्रकाशन.

संगमनेर :लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने पत्रकार संवाद यात्रेचे आयोजन केले आहे.
यानिमित्ताने माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे, डॉ.विश्वासराव आरोटे, यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर उत्तर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ काळे, तालुका अध्यक्ष संजय गोपाळे, सचिव अमोल मतकर, जेष्ठ सदस्य गोरक्षनाथ मदने, बाळासाहेब गडाख, भारत रेघाटे, सुभाष भालेराव, नितीन कोकणे उपस्थित होते.
पत्रकारांच्या समस्या सोडण्यासाठी या संवाद यात्रेची सुरुवात दि. 28 जुलै रोजी नागपूर येथील दीक्षाभूमी पासून होणार असून 8 ऑगस्ट रोजी मंत्रालय मुंबई या ठिकाणी सांगता होणार आहे.