गाव तिथे कृति समिति अभियान,गांजीभोयरे येथे कृति समितीची स्थापना

पारनेर:- तालुक्यातील दुष्काळी गावांना कुकडी प्रकल्पातून शेतीसाठी हक्काचे पाणी मिळाले पाहिजे.या साठी भूमिपुत्र शेतकरी संघटना व पारनेर तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने सुरु असलेला लढा बळकट करण्यासाठी गांजीभोयरे येथे बैठक घेण्यात आली व सर्वानुमते जम्बो कृति समिति स्थापन करण्यात आली. यावेळी जिल्हा संघटक, संतोष वाबळे, भूमिपुत्र संघटनेचे तालुका अध्यक्ष, मनोज तामखडे, सचिव अन्सार पटेल, आनंदराव झंजाड, रावसाहेब झंजाड, शिवाजीराव निंबाळकर, सुभाष पांढरे, भानुदास पांढरे, राहुल तामखडे, दत्तात्रय पांढरे, बन्सी चत्तर, अशोक पाडळे, शुभम झंजाड, भानुदास पाडळे, शरद खोडदे, प्रवीण खोडदे शिवाजी खोडदे, भाऊसाहेब नायकोडी, भाऊराव नाईकोडी, रंगनाथ पारोळे, बापू पांढरे, शिवाजी झंजाड, बाबाजी वाढवणे, शिवराम थोरात, पोपट देंडगे, मारुती चव्हाण किसन झंजाड, अशोक पाडळे, पांडुरंग पांढरे, पंढरीनाथ खोडदे, विश्वास खणसे, माणिक पवार, संतराम पांढरे, दादाभाऊ निमोणकर, भास्कर खणसे, आकाश खोडदे यांच्यासह शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.