वीज कंत्राटी कामगारांच्या बाबत ऊर्जा प्रशासनास सूचना करणार -.ना.राम शिंदे

पुणे दि 19 -वीज कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक असून उर्जा प्रशासन व कामगार खात्यामध्ये समन्वय साधून वीज कंत्राटी कामगारांना योग्य न्याय देण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील. राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा.ना.देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या सर्व सुचनेचे पालन तंतोतंत करावे अशी सूचना वीज कंपनी व कामगार विभाग प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी वर्गाला सूचना करणार असल्याचे विधान परिषदेचे सभापती मा.ना राम.शिंदे यांनी सांगितले
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघा च्या पदाधिकाऱ्यां सोबत चर्चा करताना ते बोलत होते
पुणे येथे भारतीय युवक कल्याण केंद्राच्या कार्यालयात ते आले असता महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे प्रदेश अध्यक्ष निलेश खरात , सरचिटणीस सचिन मेंगाळे,संघटनमंत्री ऊमेश आणेराव व उपसरचिणीस राहूल बोडके तसेच भारतीय युवक कल्याण केंद्राचे सचिव मा.विकास माने, पश्चिम महाराष्ट्र समरसता गती विधीचे रवी ननावरे व जेजुरी देवसंस्थानचे विश्वस्त मा.राजेंद्र खेडकर इत्यादी प्रमुख उपस्थित होते.
.उर्जामंत्री ना देवेंद्रजी फडणवीस यांनी वीज कंत्राटी कामगार संघा सोबत मीटिंग घेऊन वीज कंत्राटी कामगार हितार्थ अनेक सकारात्मक निर्णय घेतले मात्र प्रशासन त्याची अंमलबजावणी करताना दिरंगाई करत असल्याने काही कंत्राटदार व अधिकारी हे संगनमताने या वीज कंत्राटी कामगारांचे आर्थिक शोषण करत असल्याचा आरोप अध्यक्ष निलेश खरात यांनी केला.
आर्थिक व सामाजिक सुरक्षेसाठी अजुनही संर्घष करावा लागत असल्याने दोषी कंत्राटदार व मुख्य नियोक्ता यांच्या वर सनदशीर मार्गाने कारवाई करावी अशी मागणी सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केली.
राज्यातील विविध ऊद्योगातील कंत्राटी महिला कामगारांना कायद्यातील तरतूदी नुसार वेतन, सामाजिक सुरक्षा योजना, रोजगारात सुरक्षितता, काही कंत्राटदारांच्या चालू असलेल्या बेकायदेशीर कृती, पगारातून चाललेली लुट व अन्य अनेक कामगारांच्या समस्या बाबत मा.राम शिंदे यांना ठेकेदार कामगार संघ संलग्न भारतीय मजदूरसंघ भारतीय मजदूर संघाच्या वतीने आज निवेदन देण्यात आले.