नवसंजीवनी सोशल फाउंडेशन च्या वतीने महाराणा प्रताप यांची पुण्यतिथी साजरी

लोणी काळभोर- महाराणा प्रताप यांच्या पुण्यतिथीनिमित्त नवसंजीवनी सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून महावीर मतिमंद विद्यालय येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच खाऊ व किराना देण्यात आला या वेळी नवसंजीवनी सोशल फाउंडेशन चे सर्व पदअधिकारी व सभासद उपस्थित होते.
भारताच्या कान्या कोपऱ्यात गुंजणारे नाव “महाराणा प्रताप” हे शौर्य आणि वचनबद्धतेचे प्रतीक होते. महाराणा प्रताप यांची गाथा अपरंपार आहे. महाराणा प्रताप मेवाड च्या लोकांचे राजा होते. मेवाड हे स्थान राजस्थान या राज्यामध्ये येते. महाराणा प्रताप हे एक शूर राजपूत घराण्यातील होते. महाराणा प्रताप यांनी सदैव आपल्या प्रजेचे निस्वार्थपणे रक्षण केले. त्याचबरोबर महाराणा प्रताप हे फक्त लढाऊ नसून एक चांगले धार्मिक व्यक्ती सुद्धा होते.महाराणा प्रताप यांच्या आई जयवंतबाई ह्या त्यांच्या पहिल्या शिक्षिका होत्या. महाराणा प्रताप हे असे योद्धा होते ज्याना अकबराने सुद्धा सलाम केलेला आहे. महाराणा प्रताप यांच्या यशाच्या अनेक गाथा आहेत आज त्याच्या पुण्यतिथीनिमित्त नवसंजीवनी सोशल फाउंडेशन च्या वतीने महाराणा प्रताप यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.