इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि.२९/०७/२०२३

🙏 सुप्रभात 🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- श्रावण ०७ शके १९४५
दिनांक :- २९/०७/२०२३,
वार :- मंदवासरे(शनिवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:०७,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०७:०४,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- वर्षाऋतु
मास :- अधिक श्रावण
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- एकादशी समाप्ति १३:०६,
नक्षत्र :- ज्येष्ठा समाप्ति २३:३५,
योग :- ब्रह्मा समाप्ति ०९:३४,
करण :- बव समाप्ति २३:५५,
चंद्र राशि :- वृश्चिक,
रविराशि – नक्षत्र :- कर्क – पुष्य,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- सिंह,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- ज्येष्ठा वर्ज्य दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ०९:२१ ते १०:५८ पर्यंत,

लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०७:४४ ते ०९:२१ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०२:१३ ते ०३:५० पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०३:५० ते ०५:२७ पर्यंत,

❀ दिन विशेष:
कमला एकादशी, मोहेम, घबाड १३:०६ नं. २३:३५ प., भद्रा १३:०६ प., व्दादशी श्राद्ध,
————–

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- श्रावण ०७ शके १९४५
दिनांक = २८/०७/२०२३
वार = मंदवासरे(शनिवार)

मेष
राशी स्थानात चंद्र राहू अशुभ असून मानसिक आंदोलने, घरात काही विचित्र घटना असा हा दिवस आहे. पाहुणे येतील. कामाच्या ठिकाणी नाव मिळेल. दिवस मध्यम.

वृषभ
आज व्यय चंद्र राहू मानसिक आणि आर्थिक ताण देईल. कुटुंबात तुमच्या मनाविरुद्ध घटना घडतील. प्रवास घडेल. मन उद्विग्न राहिल. दिवस मध्यम.

मिथुन
राशीच्या लाभ स्थानातील चंद्र भ्रमण लाभ देणारे कौटुंबिक सुखाचे राहिल. आर्थिक लाभ होतील. गुरू शुभ फळ देईल. जोडीदाराला शुभ काळ. दिवस शुभ.

कर्क
आज दशम स्थानातून होणारे चंद्र भ्रमण गृहसौख्य देणारे आहे. अष्टम शनी कुरबुरी सुरू ठेवेल. रवी, बुध मात्र मार्ग दाखवतील. दिवस उत्तम आहे.

सिंह
राशीच्या भाग्य स्थानातून होणारे चंद्र भ्रमण आर्थिक, मानसिक आरोग्यासाठी उत्तम आहे. आनंददायक दिवस. शांत रहा. दिवस उत्तम.

कन्या
आज अष्टम स्थानातील चंद्र राहू भ्रमण घातक असून घरासाठी अशुभ आहे. जास्तीचे काम पडेल. वडिलांना काही त्रास होण्याचे संकेत. दिवस मध्यम आहे.

तूळ
कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाच्या घटना घडतील. जास्त जबाबदारी घेऊ नका. घरामध्ये जोडीदाराशी काही विषयात मतभेद असतील. दिवस मध्यम आहे.

वृश्चिक
शष्ठ स्थानातील चंद्र विचित्र अनुभव देईल. फार दिवसांनी तुमची प्रकृती ठिक असेल. खर्च होईल पण आर्थिक लाभ देखील उत्तम राहिल. दिवस बरा आहे.

धनु
आज चंद्र भ्रमण आणि तृतीय शनी सांभाळून राहण्याचे संकेत देत आहेत. वाहन योग येईल. आर्थिकदृष्ट्या काळ बरा आहे. दिवस मध्यम.

मकर
आजचा दिवस कुटुंबीयासमवेत शांतपणे घालवा. त्यांना वेळ द्या. आर्थिक लाभ होतील. कार्यक्षेत्रात काळजी घ्या. खर्च जपून करा. दिवस मध्यम.

कुंभ
आज आरोग्यास त्रासदायक दिवस राहणार आहे. तृतीय चंद्र, मंगळ धनस्थानात असून प्रकृती नाजूक, आर्थिकदृष्ट्या जपून राहण्याचा काळ आहे. प्रवास कराल. दिवस मध्यम जाईल.

मीन
आज कौटुंबिक जीवन आणि संतती याला महत्त्व असेल. प्रवास योग येतील. गुरू धार्मिक कारणांसाठी खर्च करेल. आज दिवस मध्यम.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button