श्री राधिका फाउंडेशन नाशिक चा हळदीकुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

नाशिक / प्रतिनिधी
डॉ. शाम जाधव
श्री राधिका फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा डॉ.चेतनाताई सेवक यांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात असतात. मुलांसाठी, महिलांसाठी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी त्यांचा सन्मान म्हणून वेळोवेळी त्या पुरस्कार सोहळ्यांचे देखील आयोजन करत असतात. त्याचप्रमाणे समाजसेवेची आवड असल्याकारणाने त्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून शाळा, कॉलेजेस, महिला रोजगार, शैक्षणिक या सर्व कामकाजासाठी पुढाकार घेऊन सातत्याने काम करत आले आहेत
. यावेळी देखील मकर संक्रांत, हळदीकुंकू हा कार्यक्रम टीमच्या महिलांसाठी त्याचप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी त्यांनी आयोजित केला होता. यावेळी राधिका फाउंडेशनच्या महिला त्याचप्रमाणे नाशिक मधील विविध पोलीस स्टेशनच्या निर्भया दामिनी पथकाच्या महिला पोलीस यांचा देखील हळदीकुंकू हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी महिलांना वान भेट देण्यात येऊन त्यांच्याशी संवाद देखील त्यांनी साधला. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सर्व महिलांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला, त्याचप्रमाणे विशेष म्हणजे ज्या विधवा महिला आहेत त्यांना कुठेतरी या कार्यक्रमापासून वंचित राहावे लागते अशा महिलांसाठी देखील त्यांनी यावेळी या कार्यक्रमात त्यांना सहभागी करून घेत त्यांचा यथायोग्य सन्मान केला. सर्व महिलांनी डॉक्टर चेतनाताई सेवक यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि अशाच पद्धतीने काम करत रहा आम्ही तुमच्या सोबतच आहोत असे देखील आव्हान त्यांनी यावेळी केल.