इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि.२०/०१/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष ३० शके १९४५
दिनांक :- २०/०१/२०२४,
वार :- मंदवासरे(शनिवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०७:०६,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:१५,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- उत्तरायण
ऋतु :- हेमंतऋतु
मास :- पौष
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- दशमी समाप्ति १९:२७,
नक्षत्र :- कृत्तिका समाप्ति २७:०९,
योग :- शुभ समाप्ति ११:०६,
करण :- तैतिल समाप्ति ०७:३६,
चंद्र राशि :- मेष,(०८:५३नं. वृषभ),
रविराशि – नक्षत्र :- मकर – उत्तराषाढा,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- धनु,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- कृत्तिका वर्ज्य दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ०९:५३ ते ११:१७ पर्यंत,

लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०८:२९ ते ०९:५३ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०२:०४ ते ०३:२७ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०३:२७ ते ०४:५१ पर्यंत,

❀ दिन विशेष:
कुंभायन १९:३६, अमृत २७:०९ नं.,
————–

: 🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष ३० शके १९४५
दिनांक = २०/०१/२०२४
वार = मंदवासरे(शनिवार)

मेष
मोठ्या लोकांत उठबस वाढेल. जवळचे मित्र भेटतील. उष्णतेच्या विकारांचा त्रास जाणवेल. कामाची धावपळ वाढेल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

वृषभ
बोलण्यातून कामे मिळवाल. इतरांची मने जिंकून घेता येतील. सजावटीच्या वस्तू खरेदी कराल. कलागुणांना चांगला वाव मिळेल. व्यापरिवर्गाला दिवस चांगला जाईल.

मिथुन
कफविकाराचा त्रास जाणवू शकतो. लहान प्रवास कराल. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. मनाची विशालता दाखवाल. धार्मिक भावना जोपासाल.

कर्क
आवडते पदार्थ चाखाल. कौटुंबिक गोष्टी सुरळीत पार पडतील. जोडीदारा बरोबर गप्पा-गोष्टी कराल. पैज जिंकता येईल. कलेला पोषक वातावरण मिळेल.

सिंह
मानसिक व्यग्रता जाणवेल. आपला ठसा उमटवाल. घरातील गोष्टी शांततेत हाताळाव्यात. वाहन विषयक कामे पार पडतील. जमिनीच्या कामात लक्ष घालाल.

कन्या
फार काळजी करू नये. काही गोष्टी पूर्ण होण्यास पुरेसा वेळ द्यावा. ऐशारामाच्या वस्तूंची आवड निर्माण होईल. व्यसनाच्या आहारी जाऊ नये. सामाजिक बांधिलकी जपाल.

तूळ
मनातील इच्छा पूर्ण होईल. जवळच्या मित्रमंडळींशी गप्पांमध्ये रमून जाल. नवीन स्नेहसंबंध जोडले जातील. तिखट पदार्थ खाण्याची हौस भागवाल. आत्मविश्वास वाढीस लागेल.

वृश्चिक
प्रत्येक गोष्टीत समाधान मानाल. घरातील वातावरण प्रसन्न ठेवाल. आनंदाने एकमेकांना मदत कराल. घर टापटीप ठेवाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.

धनु
कौटुंबिक जबाबदारी वाढेल. गोड बोलून कामे मिळवाल. दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी व्हाल. निसर्गाच्या सानिध्यात रमून जाल. फोटोग्राफीची हौस पूर्ण करता येईल.

मकर
श्रम वाढतील. आपले विचार उत्कृष्ठपणे मांडाल. हसत हसत कामे पूर्ण कराल. बौद्धिक चलाखी वापराल. योग्य तर्क वापराल.

कुंभ
झोपेची तक्रार जाणवेल. सामाजिक गोष्टीत लक्ष घालाल. मानापमानाच्या गोष्टी फार मनावर घेऊ नयेत. आर्थिक गुंतवणूक सावधगिरीने करावी. काही कामे अडकून पडतील.

मीन
लहानांशी मैत्री कराल. मानाने कामे कराल. चांगला आर्थिक लाभ होईल. सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. योग्य कागदपत्रे सादर करावीत.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button