साई संस्थान सोसायटी कर्मचाऱ्यांच्या वतीने चेअरमन विठ्ठल पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान !

शिर्डी प्रतिनिधी
: (संजय महाजन)
श्री साई संस्थान एम्प्लॉइज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोसायटीच्या सभासद सदस्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करत श्री साईनाथ रक्तपेढी येथे रक्तदान केले
यावेळी स्वतः विठ्ठल पवार यांनी शिबिर स्थळी जात रक्त दात्यांचा सत्कार केला तर साईबाबा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रीतम वडगावे यांनी चेअरमन विठ्ठल पवार यांचा साईबाबांची शाल देत पेढा भरवत सत्कार केला तसेच शिर्डी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अप्पासाहेब कोते यांनी रक्तदान शिबिराला हजेरी लावत चेअरमन विठ्ठल पवार यांचा सन्मान केला
यावेळी सोसायटी सभासद आणि मित्रपरिवाराने भावना व्यक्त करतांना सांगितले की सोसायटीच्या इतिहासात प्रथमच एखाद्या चेअरमनच्या वाढदिवशी अनावश्यक खर्चांना फाटा देत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याने गरजू रुग्णांना या रक्ताचा मोठा लाभ मिळणार असून रक्तदान हे श्रेष्ठदान असल्याने विठ्ठल पवारांच्या वाढदिवशी रक्तदान करण्याचे भाग्य मिळाल्याचा मनस्वी आनंद असल्याचे म्हटले तर रक्तदान शिबिरात क्वचितच दिसून येणारी बाब म्हणजे महिलांचा रक्तदान शिबिरात सहभाग… 50 ते 60 कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. आज चेअरमन विठ्ठल पवारांच्या वाढदिवसानिमित्त महिलांनी सुद्धा रक्तदान करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी संचालक मंडळ संस्थान कर्मचारी व सोसायटी कर्मचारी व शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.