श्री बाळेश्वर विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

संगमनेर प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे, श्री बाळेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सारोळे पठार. या विद्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांची भाषणे झाली. खरे आकर्षण ठरले ते लेझीम, झांज,टिपरी नृत्य, देशभक्तीपर नृत्य, या कलाविष्काराने गावकऱ्यांची मने जिंकून घेतली.
या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने श्री बाळेश्वर विद्यालयाचे प्राचार्य रमेश बेनके, श्री बाळेश्वर अनुदानित आश्रम शाळेचे प्राचार्य चंद्रकांत शिरोळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमित फटांगरे, उपाध्यक्ष रामदास गाजरे, सरपंच अहिल्याताई घुले, उपसरपंच प्रशांत फटांगरे ,जि. प. शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर फटांगरे, तुकाराम फटांगरे गुरुजी, होशीराम फटांगरे, डॉ. सय्यद मोमीन,डॉ. नरेंद्र क्षीरसागर, प्रशांत घुले,श्याम भागा फटांगरे,मेढे साहेब, सुदाम पवार, मुलांच्या वस्तीगृराचे अधिक्षक नानासाहेब कदम, मुलींच्या वस्तीगृहाच्या अधिक्षीका सुनीता औटी या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विद्यालयाचे प्राचार्य रमेश बेनके आपल्या संदेशीय भाषणात बोलत होते. आज ७४ वा प्रजासत्ताक दिन आहे.या दिनानिमित्त देशभर उत्साहात वातावरण आहे. आजच्या दिवशी भारतीय राज्यघटना लागू झाली. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले परंतु 26 जानेवारी प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. भारतीय लोकशाही जगातील इतर कोणत्याही शासनपद्धतीपेक्षा सरस आहे. या संविधानाची तोडफोड होणार नाही याबाबत आपण जागरूक राहिले पाहिजे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला आदर्श घटना दिली आपले संविधान म्हणजे सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय तसेच विचारांची अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, स्वातंत्र्य, समानता, राष्ट्राची एकता व एकात्मता जोपासणारे जोपासणारी आहे. भारताची घटना ही आदर्श व न्याय देणारी आहे. जगातील सर्वात मोठ्या पहिल्या क्रमांकाचा लोकशाही देश म्हणून जग भारताकडे पाहत आहे.संविधानामुळे आपला देश पूर्ण प्रजासत्ताक आहे लोकशाही देशात राहणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. खऱ्या देशभक्ताप्रमाणे देशाला योगदान देत राहणं आवश्यक आहे .देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता ज्या क्रांतिकारकांनी आपले बलिदान दिलेले आहे तसेच देशाचे संविधान लिहिण्याकरिता ज्यांनी आपले योगदान दिले आहे अशा सर्वांचे स्मरण हा प्रजासत्ताक दिन साजरा केल्यामुळे राहते.भारताच्या संविधानाचा आपण सखोल अभ्यास केला आणि इतिहास वाचला तर प्रत्येक नागरिकांना ज्यांच्या मध्ये प्रामाणिकता आहे त्यांना संविधान स्वतःच्या विकासाचा सर्वात मोठा मार्ग आहे याची जाणीव होईल .भारताचे संविधान जरी दोन वर्षे अकरा महिने,अठरा दिवसात तयार झाले असले तरी हे तयार होताना दोन हजार वर्षापासून चालत आलेला अन्याय , अत्याचार विषमतावादी व्यवस्थेला सुरूंग लावला. देशाच्या प्रती देशभक्तीची भावना आणि राष्ट्रप्रेम निर्माण होते खऱ्या अर्थाने आपण आपल्या देशाचे संविधान लागू झाल्यापासून स्वतंत्र झालेलो आहोत. त्यामुळे संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना तसेच स्वातंत्र्य लढ्यातील सर्व महान क्रांतिकारकांना या प्रजासत्ताक दिनानिमित्त कोटी कोटी धन्यवाद देऊया.
यावेळी सुनील साबळे, गंगाधर पोखरकर,अशोक जाधव, भाऊराव धोंगडे,तुकाराम कोरडे, बाळासाहेब डगळे, विश्वास पोखरकर,संतोष भांगरे,भारत हासे, श्रीकृष्ण वर्पे ,रघुनाथ मेंगाळ, आप्पासाहेब दरेकर, सोमनाथ गोसावी,सोमनाथ सलालकर, नारायण डोंगरे,संजय ठोकळ, हेमंत बेनके, विठ्ठल फटांगरे,चेतन सरोदे,जयराम रहाणे,गणपत औटी,मंगेश औटी,मोहन वैष्णव,मनोहर कचरे गावकरी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.