मातुलठाण सोसायटीच्या चेअरमन पदी कैलास बोर्डे व्हाईस चेअरमन पदी सतीश बोर्डे यांची निवड!

दत्तात्रय शिंदे
माका प्रतिनिधी
मातुलठाण सोसायटी ,च्या चेअरमनपदी श्री कैलास भागवत बोर्डे , तर व्हाईस चेरमनपदी , श्री सतिश सुर्यभान बोर्डे ,यांची नुकतीच निवड करण्यात आली
श्रीरामपुर तालुक्यातील मातुलठाण विविध कार्यकारी सेवा सोसायटीची सन २०२२_२३ ते २०२७-२८ ची संचालकपदाची निवडनुक प्रक्रिया राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच बिनविरोध पार पडली,
निवडणुक निर्णय अधीकारी म्हणुन सहाय्यक निबंधक श्री रुद्राक्ष , सचिव कैलास राशिनकर यांनी कामकाज पाहीले , मातुलठाण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमधे सन १९९८पासुन कैलास पा बोर्डे यांचे नेतृत्वाखाली गेल्या २४ वर्षा पासुन काम सुरू आहे वर्ष २०२२-२०२३, ते सन२०२७-२०२८ या कालावधी साठी पुन्हा एकदा संस्थेची निवडनुक बिनविरोध पार पडली, दि १७ मार्च २०२२ रोजी संस्थेचे चेअरमन पदी , कैलास बोर्डे तर व्हा चेअमन सतिश बोर्डे पदाची निवड एक मताने करण्यात आली , नवनिर्वाचित संचालक मंडळात सर्वस्वी , दरेकर एकनाथ गजानन, निकम शरद केशव, बोर्डे आभिजित विजय,, बोर्डे भगवान लक्ष्मण,बोर्डे विनायक दादासाहेब, वाणी दादासाहेब एकनाथ, वाणी विठ्ठल वामन , माळी रावसाहेब नागु , शेळके संगीता दत्तात्रय , बोर्डे सविता दिनेश, लांडे प्रशांत सुनिल उपस्थित होते