संगमनेर च्या अमृतवाहिनी मध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा

भारतीय राज्यघटना चिरायू होवो – आमदार सत्यजित तांबे
संगमनेर ( प्रतिनिधी ) स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मागील 75 वर्षाच्या वाटचालीत भारतीय राज्यघटनेमुळे प्रत्येक व्यक्तीला मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे देशांनी मोठी प्रगती साधली आहे. याउलट जगातील काही देशांमध्ये स्वातंत्र्य असूनही प्रगती नाही त्यामुळे देशाची प्रगती साधनारी भारतीय राज्यघटना चिरायू होवो असे प्रतिपादन आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे.
अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी समवेत मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक व्ही.बी.धुमाळ, डॉ.एम.ए.वेंकटेश, डॉ.जे.बी.गुरव, डॉ.मच्छिंद्र चव्हाण, डॉ.मनोज शिरभाते, डॉ.बाबासाहेब लोंढे, विलास भाटे,शितल गायकवाड, सौ.जे.बी.सेठी, अंजली कन्नड,डॉ.वाघ, प्रा.जी.बी. काळे, प्रा.विजय वाघे, नामदेव गायकवाड,प्रा.बाळासाहेब शिंदे,डॉ.सुनील सांगळे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वातंत्र्य झाला आणि 26 जानेवारी 1950 रोजी भारताने प्रजासत्ताक राज्य स्वीकारले. लोकांनी लोकांसाठी चालवलेला हा देश असून यामुळे मूलभूत अधिकार मिळाले आणि त्यातून प्रत्येकाने प्रगती केली आज भारताने जागतिक स्तरावर आपला दबदबा निर्माण केला आहे. ही भारतीय राज्यघटना अधिक समृद्ध आणि चिरायू झाली पाहिजे यासाठी प्रत्येकाला काम करावे लागणार आहे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्यासाठी लढाई केली आणि स्वातंत्र्य तर काळात शेती शिक्षण सहकाराच्या माध्यमातून तालुका उभा केला आज माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली हा तालुका समृद्धपणे महाराष्ट्रात ओळखला जातो . हलौकिक आपल्याला जपताना शिक्षण क्षेत्रातून प्रत्येक युवकाने जगात जाऊन अमृतवाहिनी सह संगमनेरचे नाव अधिक मोठे करावे याचबरोबर देशाची लोकशाही आणि राज्यघटना अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येकाने कटिबद्ध राहावे असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी अमृतवाहिनी मधील विविध स्कूल मधील विद्यार्थ्यांनी सुरक्षा अधिकारी नरेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख पाहुण्यांना शिस्तबद्ध पद्धतीने मानवंदना दिली. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बाळासाहेब शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले यावेळी इंजीनियरिंग कॉलेज,पॉलिटेक्निक, एमबीए, बी फार्मसी, डी फार्मसी,आयटीआय, मॉडेल स्कूल, जुनियर कॉलेज, इंटरनॅशनल स्कूल, अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूल, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्याल या विविध विभागांमधील विभाग प्रमुख शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यशोधन मध्ये डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे यशोधन जनसंपर्क कार्यालय येथे संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी यशोधन कार्यालयातील कर्मचारी,युवक काँग्रेसचे पदाधिकारी व शेतकी संघातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.