नेप्ती येथील फुले यांचा समता परिषदेच्या वतीने सन्मान.

अहमदनगर (प्रतिनिधी)-
नेप्ती(ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांनी उल्लेखनीय केलेल्या निस्वार्थ सामाजिक कार्याला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद ,नंदनवन मित्र मंडळ व शिवसेना ठाकरे गट यांच्यावतीने समता परिषदेचे महानगराध्यक्ष दत्ताभाऊ जाधव , सुरेश गायकवाड ,अशोक कानडे, यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते रामदास फुले यांना थोर समाजसुधारक महात्मा फुले यांचा पुतळा देऊन सन्मान करण्यात आला. माजी सभापती सुवर्णाताई जाधव यांच्या शहरातील संपर्क कार्यालयात फुले यांचा सत्कार सोहळा थाटात पार पडला. यावेळी मार्केट कमिटीचे माजी संचालक वसंत पवार ,नंदनवन उद्योग समूहाचे संचालक बाबासाहेब जाधव, संजय जाधव ,नेप्तीचे मा.सरपंच अंबादास पुंड, माजी कॅप्टन सदाशिव भोळकर, समता परिषदेचे शाखाध्यक्ष शाहूराजे होले, युवा सेनेचे उपतालुका प्रमुख विनायक बेल्हकर, आकाश महाराज फुले, भानुदास फुले, प्रा. एकनाथ होले, प्रा. भाऊसाहेब पुंड,आदेश गायकवाड ,ओमकार शेळके, दर्शन फुले समता परिषदेचे नगर तालुक्यातील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी समता परिषदेचे महानगराध्यक्ष दत्ता जाधव म्हणाले की, रामदास फुले यांनी नेप्ती शाळेचे व गावाचे नाव दिल्लीपर्यंत पोहोचले आहे .आज प्रत्येक जण इतका बिझी आहे की त्यांना समाजाकडे पाहण्यासाठी वेळच नाही. आपल्या व्यस्त कामातून समाजातील गरीब गरजूंची मदत करणे हे आपले कर्तव्य आहे हीच भावना ठेवून फुले हे काम करीत आहेत. सामाजिक कार्यकर्ते फुले यांचे 25 वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण, क्रीडा व धार्मिक क्षेत्रातील उल्लेखनिय कार्य युवकांना प्रेरणादायी आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे नगर तालुका अध्यक्ष रामदास फुले गेल्या काही वर्षापासून ओ.बी.सी.च्या मागण्या व प्रश्न समता परिषदेचे संस्थापक कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली सोडत आहेत .समाजासाठी काम करणाऱ्यांचा गौरव झाला पाहिजे . त्यांना प्रोत्साहन देणे हे आपले कर्तव्य आहे . ग्रामीण भागात काम करताना अनेक अडचणी येतात या अडचणींना अडचणींना जराही न घाबरता फुले सामाजिक काम करीत आहेत. अडचणीवर मात करून फुले यांनी केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन समता परिषदेचे महानगराध्यक्ष दत्ता जाधव यांनी केले.