व्ही.पी.एस प्राथमिक विद्यालयांत पारितोषिक वितरण!

प्रतिनिधी
:(संजय महाजन)
विद्या प्रसारिणी सभेचे व्ही.पी.एस प्राथमिक विद्यालय लोणावळा शाळेत क्रीडा पारितोषिक वितरण आणि कवायत प्रात्यक्षिके कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
नियामक मंडळाच्या अध्यक्षा मा.डॉ. मृणालीनी गरवारे मॅडम, संस्थेचे कार्यवाह मा.डॉ. सतीश गवळी सर आणि सहकार्यवाह श्री. विजयजी भुरके सर यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मंगल जाधव मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आपल्या मनोगतात त्यांनी शाळेत होणारे विविध मैदानी खेळाची माहिती विद्यार्थ्यांना दिली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री. अरविंदभाई मेहता शाला समिती अध्यक्ष यांनी भुषवले. प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री विजयजी गुप्ता उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मा.श्री. गिरीशजी पारख साहेब (शाला समिती सदस्य), प्राचार्य मा.श्री. उदय महिंद्रकर (व्ही.पी.एस हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय), मा. श्री राजूशेठ खांडेभरड (माजी सरपंच वरसोली), शाला व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा. श्री माणिक मोकाशी, मा.श्री. अभिजीत पोवार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. अरविंदभाई मेहता साहेब यांनी आपल्या मनोगतात आजच्या स्पर्धेच्या युगात खेळला महत्वाचे स्थान आहे. आज बाल वयात विविध खेळात सहभागी झालेल्या आणि बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे कौतुक केले त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच शिक्षकांनी बसवलेल्या कवायत प्रात्यक्षिक सादरीकरणाचे कौतुक केले. वर्षभर घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन त्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
क्रीडा पारितोषिक कार्यक्रमासाठी शिक्षक श्री. संजय भालचिम, श्री. प्रकाश पाटील, श्री. हनुमंत शिंदे, श्री. अमित रसाळ, शिक्षिका सौ. मनिषा जरग, सौ. सुनिता वरे, सौ. लीना निकम, सौ. कविता पंगुडवाले, सौ. संगिता पाटील, श्रीमती स्वप्नाराणी भालेराव, सौ. प्राजक्ता दिवसे शिक्षकांनी कवायत प्रात्यक्षिक सादरीकरण करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली. तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्रीमती जयश्री बागलकोटे यांनी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संजय भालचिम यांनी केले. कवायत प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे निवेदन श्री. प्रकाश पाटील यांनी केले. श्री. अमित रसाळ यांनी बक्षीस पात्र विद्यार्थी यादी वाचन केले. सौ. मनिषा जरग यांनी आभार मानले.