वाघ कुटूंबियांचा पायी दिंडी व पानसवाडी येथील गणेश मंदिराला मदतीचा हात

सोनई- प्रतिनिधी
-स्व दादा वाघ यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्ताने त्यांच्या कुटुंबातील सदस्य रमाकांत ,मल्हारी,तान्हाजी, व भाऊराव वाघ यांनी आपल्या वडिलांच्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने गावाचा एक नागरिक कर्तव्य म्हणून स्नेह फाऊंडेशन मार्फत गरीब विद्यार्थ्यांसाठी पुस्तके वाटप,पंढरपूर पायी दिंडी ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याला ५०००/- रुपये, पानसवाडी येथील गणेश मंदिर साठी ५०००/-रुपये, गावात एक वृक्षारोपण, आर्थिक स्वरूपात मदत,असा माध्यमातून ह.भ.प.उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते उपक्रम राबविण्यात आले.
या वेळी ह भ प.विश्वासराव गडाख,सोनई सोसायटीचे उपाध्यक्ष ह.भ.प. आप्पासाहेब निमसे,यांच्यासह अनेक उपस्थित होते. आभार सरपंच धनंजय वाघ यांनी मानले
.
स्व.दादा ( वडील) यांच्या आठवणीला उजाळा देत अंत्यत कष्टातून, प्रामाणिक काम,संस्कार देऊन त्यांचे आशीर्वाद हा एक कुटूंबाला व समाजाला आधार,पुण्य देण्याचे काम केले चांगली जीवनाची सुरुवात करून दिली, हिच या कार्यातून पावती स्मरण करत राहू
मल्हारी वाघ,
संचालक, सोनई वाहन मेळावा .