सुपे येथील दिवटे पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनी अहिल्यानगर येथे दिली पालकमंत्र्यांना मानवंदना

अहिल्यानगर दत्ता ठुबे :-
अहिल्यानगर येथे २६ जानेवारी – प्रजासत्ताक ध्वजारोहण पालकमंत्री माननीय श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली. यामधे पोलिस पथक, पोलिस बँड पथक, होमगार्ड पथक, राष्ट्रीय छात्र सेना (एन.सी.सी.) व स्काऊट गाईडचे पथक यांचा समावेश होता . सदर स्काऊट गाईड पथकामधे सुपा येथील दिवटे पाटील पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे स्काऊट गाईडचे पथक सामील झाले होते इयत्ता ७ , ८ , ९ वीच्या विद्यार्थ्यांना या पथकामधे सामील होण्याचा बहुमान मिळाला.पालटून कमांडर – कृष्णा शिवाजी ठाणगे व मार्कर – प्राची रामचंद ठोकळ यांनी जबाबदारी पार पाडली. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले.

मोठया उत्साहात अहिल्यानगर पोलिस मुख्यालयातील प्रजासत्ताक दिवस साजरा करण्याचा एक आदर्श अनुभव दिवटे पाटील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना मिळाला.
यावेळी ध्वजारोहणासाठी उपस्थित असलेले शिक्षणाधिकारी श्री.कडूस तसेच उपशिक्षणाधिकारी श्री. बुगे, गटशिक्षणाधिकारी सीमाताई राणे, विस्तार अधिकारी श्री. ढवळे व श्री.भिवसेन पवार, केंद्र प्रमुख श्री. चांगदेव गवळी,विद्यालयाचे संस्थापक अँड.शहाजीराव दिवटे, मुख्याध्यापक एस.डी. पळसकर, किरण कौठाळे, वैभव बारगुजे उपस्थित होते.शिक्षक वृंद तसेच पालक वर्ग या सर्वांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून प्रोत्साहन दिले.