इतर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारासाठी पतसंस्थाची एन ओ सी बंधनकारक करा – सतिश गंगवाल

शिर्डी प्रतिनिधी/ महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण भागात पतसंस्था चळवळीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणावर कर्ज पुरवठा करून अनेकांच्या जीवनात स्थैर्य निर्माण करून देण्यात पतसंस्था चळवळीचा मोठा वाटा आहे मात्र शासनाच्या कर्जमाफीच्या घोषणेमुळे कर्जदार क्षमता असूनही कर्ज भरण्यासाठी दुर्लक्ष करतात इतर बँका सोसायटी प्रमाणे पतसंस्थांचे देखील कर्ज माफ होईल हा गैरसमज पतसंस्था चळवळीसाठी हानिकारक ठरत असल्याने व त्याबरोबरच वसुलीसाठी न्यायालयीन प्रक्रियेस होणारा उशीर जाणारा कालावधी यामुळे अनेक अडचणी येत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पतसंस्थांचा देखील एन ओ सी दाखला बंधनकारक करावा अशी मागणी शिर्डी येथील श्री साई अंरिहत नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सतिश गंगवाल यांनी महाराष्ट्राचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडे शिर्डी येथे आले असता सत्कार प्रसंगी निवेदन देऊन केली
गंगवाल यांनी आपल्या निवेदनात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इतर दाखल्या प्रमाणे पतसंस्थाचा एन ओ सी दाखला बंधनकारक केला तर कर्जवसुलीसाठी मोठा फायदा पतसंस्थाना होणार आहे त्याचबरोबर पदवीधर मतदार संघाप्रमाणे संपुर्ण महाराष्ट्रातील अ व ब वर्ग सहकारी पतसंस्था मधुन पतसंस्था चळवळीच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी एक लोकप्रतिनिधी ( आमदार) देखील विधानसभेवर घेतला पाहिजे अशी मागणी केली यावेळी सहकार मंत्री ना बाबासाहेब पाटील यांनी या सर्व मागण्या बाबत राज्य सरकार सकारात्मक विचार करून निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन दिले यावेळी त्याचा साई प्रतिमा देउन त्याचा सत्कार करण्यात आला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button