इतर

आश्वी येथे होणाऱ्या अप्पर तहसील कार्यालयास कडाडून विरोध!

संगमनेर तालुका विभाजनाचा कुटील डाव असल्याचा आरोप


संगमनेर /प्रतिनिधी- 

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली एक तालुका एक परिवार ही संकल्पना घेऊन राज्यात विकसित ठरलेल्या संगमनेर तालुक्याचा  विकास मोडण्याचा कुटिल डाव करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आखला आहे. तालुका विभाजन करून संगमनेर मधील जनतेला त्रास देण्यासाठी पालकमंत्री व प्रशासनाने आश्वी बुद्रुक येथे अप्पर तहसील कार्यालय नियोजित केले आहे. निर्णयाविरुद्ध संगमनेर तालुक्यातील तरुणांसह प्रत्येक गावात मोठा संताप निर्माण झाला असून अनेक गावांमधून निषेध सभा घेत आश्वी बुद्रुक येथे होणाऱ्या अप्पर तहसील कार्यालयास कडाडून विरोध करण्यात आला आहे.

संगमनेर तालुका विभाजना बरोबर आश्वी बुद्रुक येथे जोर्वे ,पिंपळनेर संगमनेर खुर्द समनापुर या महसूल मंडळांचा आश्वी बुद्रुक येथे होणाऱ्या अप्पर तहसील कार्यालयात समावेश केला आहे. हा अध्यादेश कळताच संपूर्ण तालुक्यामध्ये संतापाची लाट निर्माण झाली. याबाबत काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून संगमनेर तालुक्याची मोडतोड सहन करणार नाही असा इशारा सरकारला दिला आहे. यानंतर गावागावांमधून या निर्णयाविरुद्धच्या निषेध सभा झाल्या.

चंदनापुरी, जोर्वे, सुकेवाडी, सावरगाव तळ, नीमज, खाजापूर ,वडगाव पान यांसह विविध गावांमध्ये निषेध सभा झाल्या याचबरोबर तातडीने हा निर्णय रद्द करावा अशी मागणी ग्रामसभा व सर्व ग्रामस्थांनी केली आहे. या सर्व ग्रामसभांना तरुणांसह महिला नागरिक यांची मोठी उपस्थिती होती तर संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये या निर्णयाविरुद्ध मोठी संतापाची लाट निर्माण झाली असून तरुणांनी सोशल माध्यमांवर याविषयी संताप व्यक्त केला आहे.
हा अन्यायकारक निर्णय लाभल्यास संगमनेर तालुका पेटून उठेल आणि मोठे जन आंदोलन उभारण्यातील असा एकमुखी ठराव गावांमधून घेण्यात आला.

संगमनेर तालुका हा विकसित तालुका म्हणून राज्यात ओळखला जात असून या तालुक्याला मागे खेचण्यासाठी हा निर्णय प्रशासन लादत असल्याने संगमनेर मधील नागरिक अस्वस्थ असून सौ शहरी –  एक संगमनेरी या उक्तीखाली संगमनेरकर एकवटले असल्याने आगामी काळामध्ये मोठा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे

चंद्नापुरी गावाला संगमनेर हे अत्यंत जवळ आहे. दळणवळणाची मोठी सोय आहे मात्र फक्त राजकीय उद्देश ठेवून या गावासह परिसरातील गावांना आश्वी बुद्रुक या अप्पर तहसील कार्यालयात जोडण्याचा सत्ताधाऱ्यांनी घातलेला घाट हा राजकारणातील कूटनीती आहे याचा आम्ही तीव्र निषेध करत असून हा निर्णय रद्द न केल्यास रास्ता रोको करण्यात येईल  

– भाऊराव रहाणे सरपंच चंदनापुरी

 तालुका तोडण्याचा डाव-

प्रशासनाच्या सोयीच्या नावाखाली तालुका तोडण्याचा डाव आहे. पालकमंत्र्यांनी नियोजित तालुका डोक्यात ठेवून आगामी काळात त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला या नवीन होणाऱ्या तालुक्यात आमदार पद मिळावे याकरता ही कुटनिती वापरली आहे आणि ही सर्वश्रुत आहे. हा सत्ताधाऱ्यांच्या सोयीचा डाव असून तातडीने निर्णय रद्द न केल्यास संपूर्ण गाव उपोषण करेल असा इशारा काँग्रेसने ते सुरेश थोरात यांनी दिला आहे

राजकीय उद्देश ठेवून तालुका तोडण्याचा डाव ठेवणाऱ्या प्रशासनाविरुद्ध मराठा महासंघ, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, लोकसेवा संघ, संगमनेर तालुका विकास आघाडी यांच्यासह विविध पुरोगामी संघटना यांनी कडाडून विरोध केला असून हा निर्णय रद्द न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button